कोपरगाव तालुका
प्रांताधिकारी शिंदेसह अधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
जनशक्ती न्यूज सेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यात महसूल विभागात लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिर्डी उपविभागीय अधीकारी तथा प्रांताधिकारी यांना नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पुरस्कार दिल्याबद्दल प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचा कोपरगावचे आ.आशुतोष काळे व कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी छायाचित्रात दिसत आहे.
नगर जिल्हाधिकारी कार्यालयात या वर्षी लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा महसूल दिनाच्या दिवशी नुकताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.त्यात शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचा समावेश आहे.त्यात अन्य महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांत महसुल नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, कोपरगाव येथील अव्वल कारकून जयवंत भांगरे,कारागृह अव्वल कारकून रवींद्र देशमुख,तलाठी भाऊपाटील जाधव,मढी येथील कोतवाल विनोद आभाळे यांचाही समावेश आहे.

या सर्वांचा कोपरगाव तहसील कार्यालयात नूकताच गौरव करण्यात आला त्यात तहसीलदार योगेश चंद्रे यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून तर अन्य अधीकारी व कर्मचारी यांचा सत्कार कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केला आहे.
यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा,उपाध्यक्ष प्रदीप साखरे,कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कारभारी आगवन,संचालक बाळासाहेब बारहाते,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,नारायण अग्रवाल,उमेश धुमाळ,किरण शिरोडे,नितीन शिंदे,संजय दुशिंग केशव भवर,सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राजेंद्र भाकरे,सुधाकर होन,प्रशांत वाबळे,लक्ष्मण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.