वन्य जीव
…या गावात वन्य प्राणी बचाव प्रशिक्षण शिबिर संपन्न!

न्यूजसेवा
संवत्सर- (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे वन्यप्राणी बचाव प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून वन विभाग कोपरगाव व ग्रामपंचायत संवत्सर यांच्या मार्फत नागपूर येथून आलेले वन्य प्राणी बचाव समितीचे संचालक अजिंक्य भासुरकर यांनी विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक,ग्रामस्थ आदींना बिबट्या व हिंस्र प्राण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.

“बिबट्या शिकार करत असताना आपल्यापेक्षा लहान प्राण्यावर हल्ला करतो हल्ला करत असताना गळ्याभोवतीच व पाठीमागून हल्ला करत असतो ज्यावेळेस बिबट्या आपल्या अन्नाच्या शोधात असतो त्याचे अन्न म्हणजे मांसाहार आहे.मादी दर अडीच वर्षांनी प्रस्तुत होते.प्रसूतीनंतर ती आपल्या पिल्लांना जवळच ठेवते त्याचं संरक्षण करते आणि अडीच वर्षानंतर प्रत्येक पिल्लू अन्नाच्या शोधात मादीपासून व नरापासून दूर अंतरावर जाते आणि भक्ष्य शोधत असताना लहान बालक,कुत्रे,वासरे,शेळी,मेंढे यावर हल्ला करतो”- अजिंक्य भासुरकर,संचालक,वन्य प्राणी बचाव समिती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून या भागात मानव-बिबट संघर्षाच्या घटना सतत वाढताना दिसत आहेत.बिबट्याच्या हल्ल्यात मागील पंधरवड्यात दोन बळी गेले आहे.परिणामी अनेकांना जीव गमवावा लागला असून ग्रामस्थ आता घराबाहेर पडतानाही भयभीत झाले आहेत.विशेष म्हणजे हे हिंस्र बिबटे आता थेट घरांच्या परिसरात आणि रस्त्यांवरही दिसू लागले आहेत.शेतात काम करणे अवघड झाले आहे.त्यामुळे ग्रामस्थांची भीती कमी करण्यासाठी संवत्सर ग्रामपंचायतीने संवत्सर येथे याबाबत जागृती शाळेचे आयोजन केले होते.

त्यावेळी माहिती देताना वन्य प्राणी बचाव समितीचे संचालक अजिंक्य भासुरकर म्हणाले की,”बिबट्या शिकार करत असताना आपल्यापेक्षा लहान प्राण्यावर हल्ला करतो हल्ला करत असताना गळ्याभोवतीच व पाठीमागून हल्ला करत असतो ज्यावेळेस बिबट्या आपल्या अन्नाच्या शोधात असतो त्याचे अन्न म्हणजे मांसाहार आहे.मादी दर अडीच वर्षांनी प्रस्तुत होते.प्रसूतीनंतर ती आपल्या पिल्लांना जवळच ठेवते त्याचं संरक्षण करते आणि अडीच वर्षानंतर प्रत्येक पिल्लू अन्नाच्या शोधात मादीपासून व नरापासून दूर अंतरावर जाते आणि भक्ष्य शोधत असताना लहान बालक,कुत्रे,वासरे,शेळी,मेंढे यावर त्यांचं लक्ष असतं.त्यासाठी आपण शेतात जात असताना लहान मुलांना बरोबर घेऊन जाऊ नये किंवा गेलेल्या असतील तर त्यांना घरी जाण जाण्यास सांगावे घराच्या भोवती झाडेझुडपे असेल तर त्याचं काढून टाकावेत प्रकाशाला बिबट्या डोळ्यावर पडल्यामुळे घाबरतो.त्यामुळे घराच्या सोबती लाईट लावावेत एखाद्या वेळेस आपल्यावर हल्ला झाल्यास त्यावेळेस हालचाल न करता शांतपणाने उभे राहावे याप्रसंगी त्यांनी बिबट्यास बेशुद्ध करण्याचं बंदुकी द्वारे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.

सदर प्रसंगी नामदेवराव पाटील गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मार्गदर्शन केले व या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रण देऊन स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी वन अधिकारी निलेश रोडे, उपसरपंच विवेक परजणे,चंद्रकांत लोखंडे,वनरक्षक भगवान जाधव,तुळस इंगळे,जनता इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक रमेश मोरे,महाविद्यालयाचे सदाफळ सर,दिलीपराव ढेपले, नाना करप, लीलाताई आचारी,दिलीप तीरमके,लक्ष्मणराव साबळे ,तुषार भारती,महेश परजणे, ग्रामविकास अधिकारी कृष्णा अहिरे,कांबळे मॅडम सर्व अंगणवाडी शिक्षिका आशाताई ग्रामस्थ आदी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार दिलीप ढेपले यांनी मानले आहे.



