जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या आजोबा (वय-५३) यांनी आपल्या चौदा वर्षीय नातीचे राहत्या घरातून अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी सोमवार दि.१३ जुलै रोजी राहते घरातून रात्री अकरा वाजेच्या सुमारास अपहरण केले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पढेगाव परिसरासह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बहुतांश अल्पवयीन मुलींचे लग्नासाठी अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे.या मुली १५ ते १८ (पूर्ण नाही) या वयोगटातील असल्याने त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून अपहरणाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला जातो.अल्पवयीन असल्याने पोलिसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात.मात्र आरोपी पकडल्यानंतर अनेकदा प्रेम प्रकरण समोर येते.बदनामीच्या भीतीने तसेच पोलिस कारवाई आणि न्यायालयीन प्रकियेत अडकले जाऊ नये यासाठी अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडूनच माघार घेतली जाते.

मुंबईसह राज्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढल्या असून त्यात १५ ते १७ वर्षे वयोगटांतील मुलींचे प्रमाण अधिक आहे.मुंबईमध्ये दररोज सरासरी चार अल्पवयीन मुलींचे अपहरण केले जाते.त्यांतील बहुतांश प्रकरणात लग्नाचे आमिष दाखविले जात आहे.अल्पवयीन मुलींचे अपहरण हा चिंतेचा विषय बनला आहे.गत वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत एकट्या मुंबईतून ११४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत.यापैकी ९१२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.बहुतांश अल्पवयीन मुलींचे लग्नासाठी अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे.या मुली १५ ते १८ (पूर्ण नाही) या वयोगटातील असल्याने त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरून अपहरणाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला जातो.अल्पवयीन असल्याने पोलिसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात.मात्र आरोपी पकडल्यानंतर अनेकदा प्रेम प्रकरण समोर येते.बदनामीच्या भीतीने तसेच पोलिस कारवाई आणि न्यायालयीन प्रकियेत अडकले जाऊ नये यासाठी अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडूनच माघार घेतली जाते.याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.या घटनेत अज्ञात आरोपीने आपल्या नातीला आपले राहते घरातून आपल्या समंती शिवाय कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.अशी फिर्याद अपहरण केलेल्या मुलीच्या आजोबांनी काल उशिरा दाखल केली आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६५/आय.पी.सी.३६३ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.दरम्यान कोपरगाव तालुक्यात मुलींच्या गायब होणाऱ्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.मागील आठवड्यातच दोन घटना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.त्यामुळे पालकांनी या वयोगटातील आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close