जाहिरात-9423439946
आरोग्य

माजी खा.काळे यांच्या जयंती निमित्त कोरोना लस मोफत देणार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.कोपरगाव तालुक्यात देखील बाधित रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांचे कोरोना विषाणूची बाधा होण्यापासून वाचविण्यासाठी माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधत कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मंगळवार दि.६ एप्रिल पासून खाजगी रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव काळे यांची जयंती दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी केली जाते.या वर्षी कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०० व्या जयंती निमित मतदार संघातील ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांना खाजगी रुग्णालयात मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.आ. काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांचे लस घेतल्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाणार असून जनसंपर्क कार्यालयातून कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल व आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण या खाजगी रुग्णालयात नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.त्यासाठी नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था देखील करण्यात आली आहे.सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हे एक मोठं आव्हान आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघावर देखील कोरोनाचे मोठे सावट आहे.जेवढे जास्त लोक ही लस घेतील तेवढी लवकरच या आजाराविरोधात समूह रोगप्रतिकारक शक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणार आहे.कोरोनापासून बचाव करण्यासाठी या संधीचा मतदार संघातील ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.

संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करीत असतांना देशात न भूतो न भविष्यती असा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.सामाजिक संघटना दरवर्षी रक्तदान शिबीर राबवीत असल्यामुळे रक्ताची उणीव कधीही जाणवली नाही.मात्र कोरोना संकटामुळे रक्तदान शिबीर होत नसल्यामुळे रक्त संकलन थांबले आहे.मागील काही महिन्यांपासून अनेक महत्वाच्या शस्त्रक्रीयेच्या वेळी गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही.व भविष्यात देखील आणखी रक्ताचा तुटवडा जाणवणार आहे.हि अडचण ओळखून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाने मंगळवार दि.६ एप्रिल पासून महारक्तदान शिबीर घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्री.साईबाबा तपोभूमी येथे दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.मतदार संघातील ज्या गावातील रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सुरक्षा पुरविण्यात येणार असून व मोफत वाहन व्यवस्था करण्यात येणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या महारक्तदान शिबीरात रक्तदान करण्याचे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे वतीने शेवटी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close