जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आपत्ती निवारणार्थ सरकारी यंत्रणांनी सज्ज राहावे-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होवू नये व संभाव्य आपत्ती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवून संभाव्य आपत्ती काळात आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत. वारंवार येणाऱ्या आपत्तींपैकी काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अलीकडे सगळ्याच देशांनी कार्यरत केली आहे. आपत्ती व्यवस्थापन चक्र हे आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रणालीमधील एक महत्त्वाचे आणि मूलभूत तत्त्व आहे. आपत्तींमुळे होणारी हानी टाळायची असेल, तर आपत्ती उद्भवायच्या अगोदरपासूनच आपत्तींचा अंदाज घेणे, आपत्तींविरोधी प्रतिबंधात्मक उपाय योजणे, आपत्तींचे उपशमन आणि आपत्तिदरम्यान योग्य बचावासाठी कार्यवाही हाती घेणे इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आपत्कालीन विविध विभागांची आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की,”कोपरगाव तालुक्यातील २८ गाव गोदावरी नदी किनारी वसलेली असून या गावातील जवळपास एक ते सव्वा लाख नागरिक राहत आहेत.गोदावरी नदीला पूर आल्यावर हि सर्व गावे प्रभावित होवून नागरिकांना होत असलेल्या त्रास टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या महसूल,पाटबंधारे,सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस, कृषी,आरोग्य,शिक्षण,अग्निशमन,नगरपरिषद,महावितरण आदी विभागानी काळजी घेणे गरजेचे आहे.जागतिक कोरोनाचे संकटाशी लढत असतांना आरोग्य विभागाने सुरु असलेला पावसाळा व त्यामुळे निर्माण होणारे साथीचे रोग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावे.आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी.जनजागृती करून नागरिकांना सूचना देणारे फलक लावावे.लसीकरण मोहीम राबवून लसीकरणाची टक्केवारी वाढवून नागरिकांचे आरोग्य आबाधित ठेवावे.कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने मागील वर्षीचा अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा अनुभव पाहता यावर्षी नागरिकांना गतवर्षीप्रमाणे त्रास होणार नाही याची दक्षता घेवून ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्या. नाले, गटारी यांची वेळीच साफ सफाई करून शहरातील सखल भागात पाणी साचून जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोपरगाव नगरपरिषद व पंचायत समितीने शहर व तालुक्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून या इमारतीमुळे अपघात होवून जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.


ब्राम्हणगाव व येथे मागीलवर्षी व यावर्षी तसेच धोत्रे येथे चालू वर्षी अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी लोकवस्तीत शिरून झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होवू नये यासाठी ग्रामीण भागातील चर,नाले यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत पाणी साचते या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे पाणी लोकवस्तीत शिरून नागरिकांचे हाल होवून वेळप्रसंगी पशुहानी व वित्तहानी होत असते.अशा घटना घडू नये यासाठी ड्रेनेज विभागाने ज्या ज्या गावातील चर,ओढे,नाल्यांमध्ये पाणी साचून हे पाणी लोकवस्तीत जाण्याची शक्यता आहे त्या त्या सबंधित ग्रामपंचायतींना साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी हे ओढे नाले स्वच्छ करण्यासाठी परवानगी देवून मार्गदर्शन करावे.पाटबंधारे विभागाने संकटकालीन परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी जुने छोटे पूल,दगडी साठवण बंधारे, गोदावरी नदी व कालव्यांवरील बंधाऱ्यांच्या भराव्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी जेणे गोदावरी डाव्या,उजव्या कालव्यांवरील एसकेप पावसाळ्यात ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी खुले करून देण्यात यावे. महसूल विभागाने मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावे. युरिया खताचा तुटवडा नसून साठेबाजी होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. सध्या सर्वच पिकांना युरिया खताची गरज आहे याची जाणीव ठेवून कृषी विभागाणे युरियाच्या साठेबाजी होत असल्याची शहनिशा करून शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी अशा साठेबाजांवर कडक कारवाई करावी.ज्या रासायनिक खत विक्रेत्यांकडे युरिया खताचा साठा आहे त्या विक्रेत्यांना युरिया विक्री सुरु करण्याचे आदेश द्यावेत.
महावितरणने वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी नादुरुस्त रोहित्र,वाकलेले पोल,झोळ पडलेल्या वीजवाहिन्या,विजवाहिन्याजवळ असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्या बाजूला कराव्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद आहेत.त्यामुळे शिक्षण विभागाने ज्या शाळा खोल्या निर्लेखित करावयाच्या आहेत त्या शाळा खोल्यांचे निर्लेखणाचे काम वेळेत पूर्ण करावे.वेळेअभावी काही धोकादायक शाळा खोल्यांचे निर्लेखणाचे काम पूर्ण न झाल्यास अशा ठिकाणी विद्यार्थी बसणार नाहीत अशा सूचना गटप्रमुखांना द्याव्यात.मंडलनिहाय असलेले पर्जन्यमापक यंत्र ग्रामपंचायत निहाय करण्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा.पोलीस प्रशासनाने आपत्तीकाळात बचाव कार्यासाठी सज्ज राहावे.अग्निशमन दलाने सर्व प्रकारच्या संकटात जनजीवन तातडीने पूर्वपदावर येण्यासाठी घटनेची माहिती समजताच घटनास्थळी जावून नागरिकांना मदत करावी. आदी सूचना आ.काळे यांनी यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close