निधन वार्ता
पुष्पाताई काळे याना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मातोश्री श्रीमती मनोरमा पाटील (धुळे) यांचे शुक्रवार रोजी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने अंमळनेर येथे निधन झाले आहे.
माजी आ.अशोक काळे व पटेल उद्योग समुहाचे प्रवीण पाटील यांच्या त्या सासूबाई तर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या त्या आजी होत्या.त्यांच्या मागे २ मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्रीमती मनोरमा पाटील यांचे निधन झाले त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता.वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी अखेरचा निरोप घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या निधनाबद्दल माजी आ.काळे,प्रवीण पाटील,ना.आशुतोष काळे यांनी शोक व्यक्त केला आहे.