जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात खरिपाची पेरणी पूर्ण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात या वर्षी तीन जुंलाच पावसाने जोरदार सलामी दिल्याने यावर्षी खरीप पेरण्या लवकर झाल्या असून या वर्षी उसासह सरासरी पेरणीचे क्षेत्र ४४ हजार ४४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.हि पेरणीची आकडेवारी ९३.६ टक्के असून गत वर्षी पेरणीचे सरासरी क्षेत्र ५१ हजार ७०९ हेक्टर इतके म्हणजेच १०८.९ टक्के इतके होते.या वर्षी ते १५.३ टक्क्यांनी कमी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी आमच्या प्रतिनिशीस दिली आहे.

गत वर्षी मका पिकाखालील क्षेत्र १८ हजार ३९५ हेक्टर,होते यावर्षी १३ हजार ५७६ इतके असून मका पिकाखालील क्षेत्र या वर्षी लष्करी अळीच्या धास्तीने ४ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र कमी झाल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे मका पिकाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान गतवर्षी ऊसाच्या क्षेत्र केवळ १९ हेक्टर होते ते यावेळी २८० हेक्टरने वाढले आहे.तर चारा पिकात यावर्षी निम्म्याने घट झाल्याचे उघड झाले आहे.

जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने नाशिक विभागात खोळंबलेल्या खरिपांच्या पेरण्यांना जुलैअखेर गती मिळाली आहे.त्यामध्ये गेल्या महिन्यात नाशिक विभागात ८१.१२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात खरिपाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल ११ टक्क्यांनी वाढ होत आता नाशिक विभागात ९२.५७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यंदा विभागातील शेतकऱ्यांच्या खळ्यावर अन्नधान्याची बरकत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात या वर्षी चांगला पर्जन्य झाला असून शेतकरी आनंदात आहे.मात्र पूर्व भागात धोत्रे आपेगाव,दहिगाव परिसरात मात्र गत पंधरावाड्यात पावसाची एकाएकी तीव्रता वाढल्याने पेरलेल्या खरीप पिकांची अडचण झाली आहे.त्या ठिकाणी आ.आशुतोष काळे यांनी समक्ष पाहणी करून कृषी व महसूल अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

या वर्षी खरिपाची पेरणीचे पिके व त्यापुढे पेरलेले क्षेत्र हेक्टरमध्ये दर्शवले आहे.खरीप ज्वारी-१०,बाजरी-१९९३.००,मका-०१,३५,७६,एकूण खरीप तृण धान्य-१५५७९,तूर-१२६,मूग-३७६,उडीद-४०,एकूण खरीप कडधान्य-५३९,तेलबिया पुढे दर्शवल्या आहेत.भुईमूग-३४७,सोयाबीन-१९४००,कापूस-३२८४,एकूण ऊस लागवड-२८०,चारापिके -२,६०९,फळ पिके-२४०२.७१,एकूण खरीप उसासह क्षेत्र-४४ हजार ४४१ हेक्टर आहे.गत वर्षी मका पिकाखालील क्षेत्र १८ हजार ३९५ हेक्टर,होते यावर्षी १३ हजार ५७६ इतके असून मका पिकाखालील क्षेत्र या वर्षी लष्करी अळीच्या धास्तीने ४ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र कमी झाल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे मका पिकाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान गतवर्षी ऊसाच्या क्षेत्र केवळ १९ हेक्टर होते ते यावेळी २८० हेक्टरने वाढले आहे.तर चारा पिकात यावर्षी निम्म्याने घट झाल्याचे उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close