कोपरगाव तालुका
शांताबाई जगताप यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर येथील श्रीमती शांताबाई जगन्नाथ जगताप यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने (दि.२४) रोजी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या मागे पाच मुली,दोन मुले,जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांच्या त्या मातोश्री होत्या. त्या खूप धार्मिक, मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत असून माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.