कोपरगाव तालुका
अड्.प्रेमसुखजी बंब यांचे निधन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ अड्.प्रेमसुखजी मोतीलाल बंब (वय-९३) यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर कोपरगाव अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
स्व.प्रेमसुखजी बंब हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून कोपरगाव शहर व तालुक्यात प्रसिद्ध होते.त्यांनी कोपरगाव न्यायालयात सुमारे ६५ वर्ष आपला वकिली व्यवसाय केला.ते कोपरगाव येथील जैन श्रावक संघाचे अंतिम श्वासापर्यंत ३५ वर्ष विश्वस्त होते.त्यांची मंगळवार दि.२३ जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास प्राणज्योत मालवली.ते जैन समाजाच्या धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात कायम अग्रेसर असत.त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.ते राजप्रेम जनरल स्टोअरचे संचालक पुनमचंद बंब,प्रसन्न पाईपचे मालक संजय बंब,नीलम मॅचिंग सेंटरचे संचालक रवींद्र बंब यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.