जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन गटात हाणामारी,वकीलालाही मिळाला प्रसाद !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील इंदिरापथ संजयनगर परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गायी बांधण्याच्या कारणावरून दोन गटात लाकडी दांडा, विटकरीचे तुकडे आदींच्या साहाय्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत तेरा जणांवर विविध दोन गुन्हे दाखल झाले आहे.दरम्यान या घटनेत मध्यस्थी करण्यास गेलेल्या वकील संघाच्या सदस्यास पोलिसांचा प्रसाद खाण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

दरम्यान हे भांडण सोडण्यासाठी प्रयत्न करत असताना तेथे वकील संघाचे सदस्य या दोन्ही गटाच्या भांडणात सहभागी होऊन सोडवणूक करीत असताना तेथे जमावबंदी मोडल्याचे कारणावरून या वकिलांचे व पोलीस अधिकाऱ्यांची वादावादी होऊन त्यात या वकील महाशयांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव शहरातील संजय नगर या उपनगरातील इंदीरापथ मार्गावर रविवार दि.२१ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन गटात गायी बांधण्याच्या कारणावरून विटांच्या तुकड्याच्या व लाकडी दांड्याच्या साहाय्याने हाणामारी झाली.दरम्यान या बाबत कोपरगाव शहर पोलिसांना या घटनेची काही नागरिकांनी खबर दिल्यावर त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राकेश मानवगावकर हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आले असता तेथे दोन गटात त्यांना हाणामारी सुरु असल्याचे चित्र दिसले.त्यात त्यांनी फिर्यादी योगेश घनश्याम गायकवाड (वय-३२)रा.इंदिरापथ संजयनगर कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रुपेश कैलास जाधव,संतोष रामभाऊ चव्हाणके,लक्ष्मण सीताराम चव्हाणके,अभि पुणेकर,दादा बाळासाहेब जाधव,रोहिणी बाळासाहेब जाधव,सरुबाई बापूराव जाधव, शंकर यादव,अभि लक्षण चव्हाणके.सर्व रा.इंदिरापथ,संजयनगर यांच्या विरुद्ध गु.र.नं.२२७/२०२० भा.द.वि.कलम ३२६,३३७,१४३,१४७,१४८,१८८(२)२६९,२७१,२९०,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या फिर्यादीत रूपेश कैलास जाधव (वय-२२) रा.इंदिरापथ,संजयनगर याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी योगेश घनशाम गायकवाड,घनश्याम गोविंद गायकवाड,मंदाबाई घनश्याम गायकवाड,मयुरी योगेश गायकवाड आदी विरुद्ध मागील भांडणाच्या कारणावरून गु.र.नं.२२८/२०२० भा.द.वि.कलम ३२३,३२४,३३७,१८८(२)२६९,२७१,२९०,५०४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close