जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांची बियाणे फसवणूक,चौकशीचे आदेश

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाईचा सामना करून खरेदी केलेले बाजरी, मका, सोयाबीन आदी बियाणांची योग्य उगवण न झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बियाणे उगवण बाबत तक्रारी आहेत अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करा व या बियाणांची उगवण का झाली याची कारणे शोधावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला नुकत्याच दिल्या आहेत.

शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे.बियाणे वेळेत उपलब्ध झाले नाही तर पेरणीचा हंगाम निघून जावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.काही रासायनिक खतांची विक्री करणारे दुकानदार शेतकऱ्यांना फक्त युरिया खताची विक्री करीत नसून युरियाची कुत्रिम टंचाई निर्माण करीत आहे.युरिया बरोबरच अन्य रासायनिक खते शेतकऱ्यांना गरज नसतांना देखील शेतकऱ्यांच्या माथी मारीत असल्याच्या तक्रारी येत आहे हि गंभीर बाब-आ. काळे

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी खरेदी केलेली महाबीज,ग्रीनगोल्ड आदी कंपनीचे बाजरी,मका,सोयाबीन आदी बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आ. आशुतोष काळे यांच्याकडे आल्या होत्या.त्या तक्रारींची गंभीर दखल घेत आ.काळे यांनी तातडीने तहसील कार्यालयात कृषी विभाग व शेतकऱ्यांची बैठक घेऊन कृषी विभागाला सूचना केल्या आहेत.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बाजरी,मका,सोयाबीन आदी बियाणांची उगवणच झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी. शेतकऱ्यांना नवीन बियाणे खरेदी करून वेळेत पेरणी करता येईल याची खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करावा. सर्व शेतकऱ्यांना एकत्रित बोलावून घेऊन मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे. बियाणे वेळेत उपलब्ध झाले नाही तर पेरणीचा हंगाम निघून जावून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. काही रासायनिक खतांची विक्री करणारे दुकानदार शेतकऱ्यांना फक्त युरिया खताची विक्री करीत नसून युरियाची कुत्रिम टंचाई निर्माण करीत आहे. युरिया बरोबरच अन्य रासायनिक खते शेतकऱ्यांना गरज नसतांना देखील शेतकऱ्यांच्या माथी मारीत असल्याच्या तक्रारी येत असून या तक्रारींची शहनिशा करून अशा खत विक्रेत्यांवर कारवाही करण्याचे आदेश आ.काळे यांनी कृषी विभागाला दिले.

या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कारभारी आगवन, सोनाली साबळे,सोनाली रोहमारे,जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,संजय आगवन,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू निकोले,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,रोहिदास होन,राहुल जगधने, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी मनोज सोनवणे,पंचायत समिती कृषी अधिकारी पंडित वाघिरे,महाबीज फिल्ड ऑफिसर कविता देवढे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close