जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात निराधारांना मनसेचा आधार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने कोपरगाव शहरात येवला रोड मनसे शाखा आणि हिंदूसम्राट संघटनेच्या वतीने निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना संकटात बचावासाठी मुखपट्या आणि पावसापासून बचावासाठी छत्र्यांचेही वाटप करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्यात करोनाचे संकट असताना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही जिथे आहात,तिथे जनतेला मदत करा,दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होते.राज ठाकरेंच्या सूचनेनुसार कोपरगावात निराधारांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम सुरक्षित अंतराचे पालन करून हाती घेण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्यात करोनाचे संकट असताना वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले होते. तुम्ही जिथे आहात,तिथे जनतेला मदत करा,दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होते.
राज ठाकरेंच्या सूचनेनुसार निराधारांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम सुरक्षित अंतराचे पालन करून हाती घेण्यात आले असल्याची माहिती येवला रोड शाखेचे अध्यक्ष अतिश शिंदे यांनी दिली आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशाखाध्यक्ष अनिकेत खैरे,खजिनदार स्वप्नील खैरे,मार्गदर्शक विशाल खैरे, हिंदूसम्राट संघटनेचे बापू काकडे प्रयत्नशील होते.

पक्षाचे शहराध्यक्ष सतीश काकडे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,शहर उपाध्यक्ष अनिल गाडे,वाहतूक सेना शहर अध्यक्ष सचिन खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे.मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close