जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राहुरीच्या बरोबरीने कोपरगावची विकासकामे मार्गी लावणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यास अहंम ठरणाऱ्या पाच क्रमांकाच्या साठवण तलावाबरोबरच आपण तालुक्याची प्रलंबित कामे राहुरी तालुक्याच्या बरोबरीने पूर्ण करू असे आश्वासन राज्याचे ऊर्जा आणि नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी कोपरगाव येथे एका कंर्यक्रमात बोलताना दिले आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच क्रमांकाचे साठवण तलावाचे काम गत वर्षीच झाले असते मात्र त्यात राजकारण येऊन ते टाळले गेले.कोपरगावच्या तत्कालीन राजकीय नेत्यांनी केवळ विधानसभा निवडणुकीमुळे टाळल्याचा आरोप केला.मात्र मंत्री पद मिळाल्याबरोबर ना.प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः फोन करून या प्रश्नांची आस्थेने विचारपूस केल्याची आठवण करून दिली.व या प्रश्नाला तेच न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

देश व राज्यात कोरोना विषाणूंचा कहर सुरु असताना कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसील कार्यालयात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते त्या वेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे,कोपरगाव पंचायत समोतीच्या सभापती वैशाली जगधने,माजी सभापती अनुसया होन,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,उपसभापती अर्जुन काळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी कोपरगाव तालुक्याच्या आ. आशुतोष काळे यांनी समस्या मांडल्या आहे.त्यात विजेचा प्रश्न त्यांनी प्राधान्याने मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.व महावितरणचे अधिकारी हे आश्वासन देऊनही आपली कामे वेळेत पूर्ण करत नसल्याचा आरोप केला.त्यावेळी ना.तनपुरे यांनी हि प्रलंबित कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान त्यांनी तालुका प्रशासनाने कोरोना कालखंडात कौतुकास्पद काम केल्याची पावती दिली आहे.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव तालुक्याला आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने चांगले लोकप्रतिनिधी मिळाले आहे ते सातत्याने प्रलंबित कामांचा पाठपुरावा करत असतात पाच क्रमांकाच्या तलावाचा प्रश्न त्यांनी अग्रक्रमाने आपल्या हाती घेतला आहे.व तो आपण लवकरच मार्गी लावणार आहे.सध्या कोरोनाने सगळ्या जगाला विळखा घातला आहे.त्यामुळे सरकारची गंगाजळी गोठली आहे त्यामुळे विकासकामांवर प्रातिकूल परिणाम होणार आहे.हे जरी खरी असले तरी अग्रक्रमाने हि कामे आपण मार्गी लावणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासह चार राज्यमंत्र्यांना तुम्हाला कोणती खाती हवी याचा अर्ज मागितला तेंव्हा आपल्याला ऊर्जा खाते घ्यावे की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.मात्र हा प्रश्न शेतकऱ्याशी निगडित असल्याने आपण पूर्ण विचारांती हे खाते घेतले आहे.नगरविकास खाते तर आपण नगराध्यक्ष असल्याने ते आपल्या आवडीचेच खाते होते.असे सांगून शेतकरी हितासाठी आपण मागेपुढे पाहणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे या मतांचे आपण असून बिबट्याची भीती शेतकऱ्यांना आहे.कोपरगावसह राज्यात हा प्रश्न गंभीर आहे.यासाठी आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळायला हवी.शिवाय विद्युत रोहित्रे शेतकऱ्यांना एका दिवसात विनाशुल्क मिळायला हवे.अशी सक्त ताकीद त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली आहे.ग्रामीण भागात आजही पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर आहे.या योजनांना आपण चोवीस तास असलेल्या वीज जोडण्या देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.यावेळी त्यांनी आ. आशुतोष काळे व कोपरगाव तालुका प्रशासन यांनी कोरोना साथीच्या कालखंडात चांगले काम केल्याचे कौतुक केले आहे.दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी कोरोना कालखंडात खाजगी बँका दादागिरी करत सक्तीच्या वसुल्या करीत आहे.या कडॆ मंत्र्यांचे लक्ष वेधले त्या वेळी ना.प्राजक्त तनपुरे यांनी अशा बँकांच्या तक्रारी असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

या वेळी मंत्र्यांचे स्वागत करताना व कार्यक्रम संपल्यावर त्यांना निरोप देताना कार्यकर्त्यांनी सुरक्षा अंतराचा दुर्दैवाने फज्जा उडवलेला पाहायला मिळाला आहे.हि गंभीर बाब असतानाही याकडे तालुका प्रशासनाने दुर्लक्ष करताना दिसून आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यात चौदा हजार पेक्षा जास्त नागरिक परगावाहून आले असून ४७९ जणांना संस्थात्मक विलगीकरण केले आहे.व १०० बेडच्या उपचाराची सोय केली असून अजून १ हजार रुग्णांची सोय निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.त्यावेळी त्यांनी कोरोना काळात शहरात एक महिलेचा बळी गेला मात्र त्यानंतर मात्र एक महिला डॉक्टर आढळली मात्र त्यांचा अहवाल औषधोपचारानंतर नकारात्मक आल्याचे सांगून आता धोत्रे येथील अल्पवयीन मुलगी केवळ कोरोना बाधित असल्याचे सांगून आज उपचारानंतर तिला सोडून देण्यात येणार असल्याची माहिती सांगितली आहे.व आज कोपरगाव तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसल्याचे सांगितले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी मानले.यावेळी तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,कारभारी आगवन,राहुल रोहमारे,आदींनी विविध समस्या मांडल्या आहे.दरम्यान या बैठकीसाठी आलेल्या नागरिकांनी कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारात व कार्यक्रमानंतर गर्दी करून सुरक्षित अंतराचा फज्जा उडवल्याचे दिसून आले आहे.यावर प्रशासनाने अनर्थ घडण्यापूर्वी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close