जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहर विकासाचे काम करण्यास नगराध्यक्ष वहाडणे समर्थ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गेल्या अनेक वर्षात जमले नाही ती कामे नगरपरिषद पूर्ण करीत आहेत.तुम्ही कितीही अडथळे आणले तरी समाजाचे काम करण्यास कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे काम करण्यास समर्थ आहेत असे प्रतिपादन भाजपचे माजी अध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

वर्तमानात काहींना आमदारकी नाही,नगरपरिषद,पंचायत समिती ताब्यात नाही म्हणून अस्वस्थ झाल्याने काहीही बेताल आरोप करत आहेत. तुम्ही व तुमचे लाभार्थी यांनी अध्यक्ष वहाडणे यांना कितीही अडथळे आणले तरी ते काम करण्यास समर्थ आहेत.गटारातील गाळ काढला,औषधे फवारली, साठवण तलावातील गाळ काढला, शौचालये साफ केली त्याचा भाजप कार्यकर्त्याना रास्त अभिमान आहे.आडून आरोप करणाऱ्यांनी व त्यांच्या पित्यांनी मात्र सहकारात,पालिकेत डल्ला मारला आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.नगरपरिषदेची पाणीपट्टी,वीजबिल थकवून तिजोरी साफ केली हे जनता जाणून आहे

कोपरगाव शहरात सध्या सत्ताधारी भाजपचे माजी उपाध्यक्ष विजय वाजे यांनी अध्यक्ष विजय वहाडणे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या असून त्यावर भाजपचे माजी शहर अध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी उत्तर दिले आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की.”आपणाकडे ४० वर्ष आमदारकी काही वर्षे मंत्रिपद राज्य पातळीवरील अनेक संस्थांचे सदस्यत्व,सहकारी संस्था,कोट्यावधी रुपयांचे राक्षसी पाठबळ असतांनाही तुमचा पराभव झाला.साहेब,दादा,ताई,भैया असे तथाकथित कर्तृत्ववान नेते व त्यांनी पोसलेले अनेक कार्यकर्ते विरोधात असतांनाही नगराध्यक्ष विजय वहाडणे नगरपरिषदेत एकाकी झुंज देऊन विकास करत आहेत.कोल्हेच्या समर्थकांनी नगरपरिषदेत न केलेली कामे वहाडणे हे करत आहेत.तुम्हाला १० वर्षात जमले नाही त्या ५ नंबरच्या साठवणतलावाचे काम त्यांनीच मार्गी लावले.तीन उद्यानांचे लोकार्पण केले.शाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास जात आहे.पालखी मार्गही पूर्ण होत आहे.तुमची पाणी चोरीही उघडकिस आणली.प्रत्येक प्रभागात भूमिगत गटारी,रस्ते,पेव्हर ब्लॉकची कामे केली आहे.कचरा कुंड्या बंद करून शहर स्वच्छतेत बाजी मारली आहे.व विविध पुरस्कार प्राप्त केले आहे.महामार्गावरील पथदिवे सुरू केले आहे.भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा अनुभव जनतेने घेतला आहे.आठवडे बाजार ओटे दर्जेदार नुकतेच बांधून घेतले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे प्रवेशद्वार सुशोभित केले आहे.पूर्वीच्या सत्ताधीशांनी बाटोळे केलेले रस्ते सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे.अनेक वर्षे अर्धवट असलेले कत्तलखान्याचे पूर्ण करून गोहत्या होऊ नये यासाठी प्रयत्न केले आहे.पण या तथा कथित नेत्यांचे काही कार्यकर्ते संजयनगर भागात बेकायदा गोहत्या करत आहेत.त्यांना बोलण्याची तुमच्यात हिंमत या नेते म्हणून मिरावणाऱ्यात आहे का ? असा कडवा सवाल विचारला आहे.

तुम्ही निधी आणण्यात अडथळे आणले तरीही अध्यक्ष वहाडणे यांनी गेल्या १० वर्षात झाली नव्हती इतकी कामे साडेतीन वर्षात केली आहेत.खरे तर अशी कामे करणे हे कर्तव्यच आहे.कामे झाली नाहीत असा आरोप होतो म्हणून जनतेच्या माहितीसाठी हे सांगण्याची वेळ आणली आहे.नगरपरिषदेत सर्वसामान्य नागरिकाच्या कामांना प्रतिसाद मिळू लागला त्यामुळे कोल्हे यांचे एकच काम सुरू असून वहाडणे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र.मात्र ते कधीही यशस्वी होणार नाही.कोल्हे यांच्याच अनुयायांनी अनेक अतिक्रमणे केली आहेत.बेकायदा नळजोड घेतले त्याविरुद्ध कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा उद्योग आरोप मंडळीच करत आहे. बड्यांची अतिक्रमणे बेकायदा नळजोड हा विषय वहाडणे यांनी सोडलेला नाही हे संबंधितांनी ध्यानात घ्यावे.आताही कोरोनाच्या संकटात प्रामाणिक कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष वहाडणे हे स्वतःही प्रशासनाच्या मदतीला रात्रंदिवस उभे होते.वर्तमानात काहींना आमदारकी नाही,नगरपरिषद,पंचायत समिती ताब्यात नाही म्हणून अस्वस्थ झाल्याने काहीही बेताल आरोप करत आहेत. तुम्ही व तुमचे लाभार्थी यांनी अध्यक्ष वहाडणे यांना कितीही अडथळे आणले तरी ते काम करण्यास समर्थ आहेत.गटारातील गाळ काढला,औषधे फवारली, साठवण तलावातील गाळ काढला, शौचालये साफ केली त्याचा भाजप कार्यकर्त्याना रास्त अभिमान आहे.आडून आरोप करणाऱ्यांनी व त्यांच्या पित्यांनी मात्र सहकारात,पालिकेत डल्ला मारला आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.नगरपरिषदेची पाणीपट्टी,वीजबिल थकवून तिजोरी साफ केली हे जनता जाणून आहे असेही प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.पत्रकावर प्रा.सुभाष शिंदे,संजय कांबळे,विजय बडजाते, वसंत जाधव आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close