जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोकमठाण शिवारामध्ये चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पोलीस यंत्रणा टाळेबंदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी गुंतली असल्याचे पाहुन चोरटयांना मोकळे रान मिळाले आहे या अगोदर चोरटयांनी सुरेगाव येथील किराणा दुकानात व शहाजापुर रोडवरील इलेक्ट्रीक दुकानात चोरी केली असुन आता चोरट्यांनी जेऊर कुंभारी येथील रहिवासी जयराम तुळशीदास चव्हाण यांचे कोकमठाण हद्दीत तीनचारी जवळ आश्विन मेडीकल नावाचे औषधाचे दुकान दि. १० जुनच्या मध्यरात्री चोरटयांनी दुकानचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील नोटा स्वरूपातील् १० हजार रूपये व चिल्लर स्वरूपातील ३ हजार रुपये अशी रोख रक्कम तसेच दुकानातुन पार्क अॅव्हेन्यूची ६५ रूपये किंमतीचे पाॅकीट,व सेन्टच्या बाटल्या असा एकुण २o हजार रूपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून पोबारा केल्याची माहीती दुकान मालक जयराम चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दुसऱ्या घटनेत त्याच रात्री तिनचारी परीसरातील नजिकच्या श्रुती ज्वेलर्स हे सोनाराचे दुकान चोरटयांनी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु मजबुत संरक्षण व्यवस्थेमुळे तो प्रयत्न फसला मात्र त्याचे हे कृत्य दुकानातील चलचित्रणात कैद झाले असुन पोलिस निरीक्षक कोपरगाव शहर पोलिस ठाणे यांनी चोरीची नोंद करावी तसेच घटनास्थळी येऊन पंचनामा करुन गुन्हेगारास पकडून आमची चोरी झाल्याली रक्कम व वस्तु परत मिळविण्यास मदत करावी अशी मागणी करीत असल्याचे जयराम चव्हाण यांनी शेवटी सांगीतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close