कोपरगाव तालुका
..या गावातील नऊ कोरोना संशयित ताब्यात !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नऊ जण राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण या व्यक्तींच्या घरी जेवण करण्यासाठी आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या सातही व्यक्तींना श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात विलगीकरण कक्षात रवाना करून त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता या गोधेगाव मधील संशयित ९ रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.यातील पाच रुग्ण मोठ्या जोखमीचे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यांचेच श्राव त्या साठी अग्रक्रमाने नगर येथे तपासणीसाठी पाठवले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग पूर्ण बंद केला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७०८ ने वाढून ती १ लाख ९१ हजार ३५६ इतकी झाली असून ५ हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ६७ हजार ६५५ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २ हजार २८६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०८ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी पाचव्यांदा वाढवून ३० जून पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता या गोधेगाव मधील संशयित ९ रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.यातील पाच रुग्ण मोठ्या जोखमीचे असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यांचेच श्राव त्या साठी अग्रक्रमाने नगर येथे तपासणीसाठी पाठवले आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग पूर्ण बंद केला आहे.ताब्यात घेतलेले श्राव नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले आहे.त्यांचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे.त्यातून कोपरगावचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे.कोपरगाव तालुका आता वैजापूर,राहाता,नाशिक,आदी सर्व बाजूनी घेतला आहे.मात्र प्रशासनाने आता अपर्यंत आपल्या जीवाची बाजी लावत तालुका आतापर्यंत सुरक्षित राखला होता.आज मात्र भविष्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याने नागरिकांचे त्याकडे लक्ष लागुन आहे.