कोपरगाव तालुका
..या गावात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी,खंडेरावांशी झाले.त्यांच्या निधनानंतर राज्याचा कारभार त्यांनी राघोबादादांशी टक्कर देऊन सलग सत्तावीस वर्ष यशस्वीपणे चालवला होता.
त्यावेळी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस हे.कॉ.भगवान ढाका,पत्रकार माणिक उगले,अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कोळपे,शिवा भोंगळ त्यांचा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य उपस्थित होते. पोलिस ढाका यांनी अहिल्यादेवी यांचा प्रतिमेलाला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन केले आहे.