कोपरगाव तालुका
..या गावात एका दिवशी पाच विवाह,दीड कोटींची बचत
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे स्थान आहे.सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते.धार्मिक विधिंबरोबरच एक ‘कार्य’ या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात.मात्र वर्तमानात कोरोना विषाणूमुळे सर्व प्राचीन परंपरा खंडित करण्याचा अनास्था प्रसंग समाजावर गुदरला आहे.त्यामुळे पैशाची बचत तर होतेच पण सामान्य माणसाला हा विवाह सोहळा आपल्या आवाक्यातील वाटू लागला आहे.यातून एकट्या कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात पाच विवाह सोहळे नुकतेच पार पडल्याने जवळपास दीड कोटी रुपयांची बचत झाली असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे या नव्या प्रथेचे अनेकांनी स्वागत केले आहे.
एरवी लग्न कार्य म्हणजे मुलीच्या पालकांना गळ्याला फास मानला जात होता. या वाढत चाललेल्या प्रथेने अनेक शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे.मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी माघार घ्यायला कोणीच तयार नाही.काळाच्या रहाटा बरोबर सर्वांचा वहात जाण्याचा प्रसंग “लग्न” किंवा “विवाह” हा विधी आणत होता मात्र आता कोरोना काळात आता इच्छेने किंवा अनिच्छेने सर्वानाच त्याचा अवलंब करावा लागत आहे.त्यामुळे सामाजिक समानता आता खऱ्या अर्थाने अवतीर्ण झाली आहे असे म्हटले तर वावगे वाटू नये.
हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे. ‘अनंता वै वेदाः’ म्हणजे वेद अनादी आहेत. जी गोष्ट प्राचीन आहे.ती जगन्मान्य आहे.ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरूष सूक्तामध्ये केली आहे.वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जावेत असे म्हटले आहे.त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे.विवाह ह्या शब्दाची व्युत्पत्ती वि + वह् अशी आहे.विशिष्ट मार्गाचे जीवन,कुळ,समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे.सहधर्माचरण,सहनशीलता,संयम,सहकार्य,निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह.विवाह हा हिंदुंचा ‘संस्कार’ आहे, ‘करार’ नाही.त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रध्देचेही बरेच वरचे स्थान आहे.सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते.धार्मिक विधिंबरोबरच एक ‘कार्य’ या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. वर्तमान काळ तर लग्नाचा कालखंड आहे मात्र वर्तमान कोरोना साथीने सर्वांचे जगणे म्हणजे “नजरकैद” ठरली आहे.मात्र समाजाच्या हितासाठी शासनाला तो अप्रिय निर्णय राबवावा लागत आहे.मात्र वाईटातून चांगले निर्माण होण्याची वेळ म्हणतात तशी वेळ आता आली आहे.एरवी लग्न कार्य म्हणजे मुलीच्या पालकांना गळ्याला फास मानला जात होता. या वाढत चाललेल्या प्रथेने अनेक शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे.मात्र खोट्या प्रतिष्ठेपायी माघार घ्यायला कोणीच तयार नाही.
संवत्सर येथे तेथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब नारायण दहे यांचे चि. किरण व वैजापूर तालुक्यातील नानासाहेब ओंकार ठोंबरे यांची कन्या शीतल यांच्यासह पाच विवाह सोहळे सध्या पद्धतीने पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यामुळे जवळपास १ कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काळाच्या रहाटा बरोबर सर्वांचा वहात जाण्याचा प्रसंग “लग्न” किंवा “विवाह” हा विधी आणत होता मात्र आता कोरोना काळात आता इच्छेने किंवा अनिच्छेने सर्वानाच त्याचा अवलंब करावा लागत आहे.त्यामुळे सामाजिक समानता आता खऱ्या अर्थाने अवतीर्ण झाली आहे असे म्हटले तर वावगे वाटू नये.संवत्सर येथे तेथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब नारायण दहे यांचे चि. किरण व वैजापूर तालुक्यातील नानासाहेब ओंकार ठोंबरे यांची कन्या शीतल यांच्यासह पाच विवाह सोहळे सध्या पद्धतीने पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यामुळे जवळपास १ कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.या लग्नसराई मुळे अनेकांना आपला थाट-माट आवरून धरावा लागल्याने अनेकांना या संधी पासून वंचित रहावे लागले असून बाजारपेठेतील अनेकांचा व्यवसाय,रोजगारही बुडाला आहे.व्यापार पेठेतील चलन-वलन थांबले आहे.हि याची दुसरी काळी किनारही विसरता येणार नाही.