सतीश रासकर
जवळा (वार्ताहर)
आठ्ठेचाळीस तासात खुनाचा तपास लावून आरोपी जेरबंद
पारनेर पोलिसांची कामगिरी ,,,,
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील महिलेचा दि २३ मार्च रोजी रात्री अज्ञात इसमाने धारदार हत्याराने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना घडली त्याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच नगर चे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री इशू सिंधू यांचे मार्गदर्शना खाली पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तातडीने हालचाली करत तपासाची सूत्रे फिरवली व अवघ्या अठ्ठेचाळीस तासातच खुनाचा तपास लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या याबाबत नागरिकांनी पोलिसांच्या कार्यवाहीवर समाधान व्यक्त केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे
पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील राणच्या वस्तीवर राहणारी महिला मनीषा सुरेश जासूद वय ४२ हिचा रात्री सात ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने गळा चिरून खून करून आरोपी पसार झाला असल्याची तक्रार सदर महिलेचा मुलगा संदीप सुरेश जासूद वय १९ याने पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केली त्यानुसार परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी वरिष्ठनच्या मार्गदर्शन नुसार पोलिसांचे पथक तयार करून तपास केला असता संशयित म्हणून मयत मनीषा सुरेश जासूद यांच्या माहेरकडील इसम सुरेश नामदेव ढगे वय ४५ याच्यावर तपासाची सुई फिरली त्यानुसार त्याचा गावाकडे जाऊन शोध घेतला असता तो गावात मिळून आला नाही गावातून तो फरार झाला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून वरीष्ठच्यां मार्गदर्शनानुसार भिवंडी जी ठाणे येथून सदर आरोपीच्या भावाच्या घरून शिताफीने त्यास अटक केली व तपास केला असता अनैतिक संबंधातून खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली,, यावेळी पो ना अरविंद भिंगारदिवे , पो. काँ. शिवाजी कावडे, पो. काँ, महेश आव्हाड, पो. ना. विनोद बोरगे पुढिल तपास करीत आहे.
जाहिरात-9423439946