कोपरगाव तालुका
कुंभारीत परीसरात जंतुनाशक फवारणी
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी गावातुन नोकरी, शिक्षण साठी बाहेरगावी गेलेले नागरीक परत गावात आले असुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत तसेच दक्षता समितीच्या वतीने विलगीकरण कक्ष परीसरात हायड्रोक्लोरोक्विन या जंतुनाशकाची फवारणी केल्याची माहीती पोलिस पाटिल उल्हास मेढे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात इतर ठिकाणी अडकलेल्या नागरीकांना आप आपल्या गावी जाण्यास शासनाने परवानगी दिली असुन त्या करीता प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. पार्श्वभुमीवर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत बाहेरगावाहुन आलेल्या गावातील तिन नागरीकांना प्राथमिक शाळा कुंभारी येथे विलगीकरण कक्षात ठेवले असुन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या कडुन वेळोवळी त्यांची आरोग्य तपासणी होत आहे.
कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यात मृत्यूदरही वाढत चालला आहे.त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात इतर ठिकाणी अडकलेल्या नागरीकांना आप आपल्या गावी जाण्यास शासनाने परवानगी दिली असुन त्या करीता प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. पार्श्वभुमीवर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत बाहेरगावाहुन आलेल्या गावातील तिन नागरीकांना प्राथमिक शाळा कुंभारी येथे विलगीकरण कक्षात ठेवले असुन आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्या कडुन वेळोवळी त्यांची आरोग्य तपासणी होत आहे. या परीसरात स्वच्छता करून जंतुनाशकाची फवारणी केली जात आहे.तसेच गाव दक्षता समितीच्या वतीने त्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याने विलगीकरण केलेल्या नागरीकांनी तसेच त्यांच्या कुंटुबियांनी समाधान व्यक्त केले आहे.