कोपरगाव तालुका
सांगवीत एकावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादीच्या मालकीची चालू विद्युत पंपाची वायर काढून ती बंद पाडल्याच्या कारणावरून आरोपी संदीप बाबासाहेब क्षीरसागर याचे विरुद्ध फिर्यादी भाऊसाहेब छगन वाव्हळ (वय-३४) यांनी कोपरगाव तालुकापोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भाऊसाहेब वाव्हळ व आरोपी संदीप वाव्हळ हे एकाच गावातील असून ते एकमेकाला चांगलेच ओळखतात.तरी देखील आरोपी संदीप क्षीरसागर याने फिर्यादीस त्रास देण्याचे उद्देशाने बुधवार दि.८ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गट क्रं.३६७ मधील फिर्यादीचॆ मालकीची चालू विद्युत मोटार वायर काढून बंद केली व फिर्यादिस जातीवाचक शिवीगाळ करून हि जमीन तुझ्या काय बापाची आहे का ? असे म्हणून या जमिनीत पाय ठेवला तर तुमचा तंगडे मोडून ठेवील अशी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीचे पत्नी सोडवणूक करीत असताना आरोपीने तिच्याशी झटापट करून तिला अर्वाच्च शिवीगाळ करून तिचा हात पिरगाळून तिला लोटून देऊन पुन्हा इकडे फिरकला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी भाऊसाहेब वाव्हळ व आरोपी संदीप वाव्हळ हे एकाच गावातील असून ते एकमेकाला चांगलेच ओळखतात.तरी देखील आरोपी संदीप क्षीरसागर याने फिर्यादीस त्रास देण्याचे उद्देशाने बुधवार दि.८ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गट क्रं.३६७ मधील फिर्यादीचॆ मालकीची चालू विद्युत मोटार वायर काढून बंद केली व फिर्यादिस जातीवाचक शिवीगाळ करून हि जमीन तुझ्या काय बापाची आहे का ? असे म्हणून या जमिनीत पाय ठेवला तर तुमचा तंगडे मोडून ठेवील अशी जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीचे पत्नी सोडवणूक करीत असताना आरोपीने तिच्याशी झटापट करून तिला अर्वाच्च शिवीगाळ करून तिचा हात पिरगाळून तिला लोटून देऊन पुन्हा इकडे फिरकला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन अपमानित केल्याची फिर्यादी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.११९/२०२०.अ. जा.ज.अ. प्र. का.कलम३(१),(आर)(एस)३(१)(डब्ल्यू)(अ)३(२),५(अ)व भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६,३५४,(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी समक्ष तपास श्री वाकचौरे हे करीत आहेत.यातील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसानी हजर केला असता त्यास दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.