जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या परिसरात पांथस्थांसह व्यापाऱ्यांचा उपद्रव वाढला

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे नियमित आयोजित करण्यात येत असललेला आठवडे बाजार कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून बंद ठेवण्यात आला आहे.तथापि या गावाजवळून जुना मुंबई-नागपूर हा राज्यमार्ग जात असल्याने गावाकडे जात असलेल्या मजुरांचा व येवला भागातील व्यापाऱ्यांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांनी आपल्या तोंडाला मास्क लावणे गरजेचे बनले असून ग्रामस्थांनी ते लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता मेहेत्रे व माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी केले आहे.

संवत्सर या गावालगत नागपूर-मुंबई महामार्ग असून या मार्गाने अवजड वाहतूक तसेच पूर्वेकडील गावे,येवला भागातील काही गावातील व्यापारी आपली फळे,भाजीपाला,भेळभत्ता आदींचे व्यापारी,शिर्डी,लोणी,आदी ठिकाणी उपचारासाठी जाणारांची संख्या वाढत चालली आहे.त्याच बरोबर ग्रामस्थांची चिंताही वाढत चालली आहे.रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणे या पांथस्थांची विसाव्याची ठिकाणे बनली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८५ ने वाढून ती ६३ हजार ४५० इतकी झाली असून २११० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २० हजार २२८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका प्रशासन दक्षता घेत आहे.गावोगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक आदी मान्यवर आपल्या गावात हि साथ शिवाबाहेरच थोपली जावी या साठी प्रयत्नशील आहे.तरीही जाणारे-येणारे मजूर,कामगार,परप्रांतीय कामगारांचे लोंढे थांबण्याचे नाव घेत नाही हि चिंतेची बाब आहे.त्याला संवत्सर ग्रामपंचायत अपवाद नाही.या गावालागत नागपूर-मुंबई महामार्ग असून या मार्गाने अवजड वाहतूक तसेच पूर्वेकडील गावे,येवला भागातील काही गावातील व्यापारी आपली फळे,भाजीपाला,भेळभत्ता आदींचे व्यापारी,शिर्डी,लोणी,आदी ठिकाणी उपचारासाठी जाणारांची संख्या वाढत चालली आहे.त्याच बरोबर ग्रामस्थांची चिंताही वाढत चालली आहे.रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणे या पांथस्थांची विसाव्याची ठिकाणे बनली आहे.त्यामुळे नको ती भीती ग्रामस्थांत वाढत चालली आहे.अनेक गावांनी आपले प्रमुख रस्ते खड्डे खोदून बंद केले आहे.

शिरसगाव,ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांनी मास्क लावावे व सुरक्षित अंतर पाळावे,सार्वजनिक ठिकणी थुंकू नये यासाठी जनजागृती करण्याचे व नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचे काम तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,सहाय्यक फौजदार श्री.पवार,उपसरपंच इरफान पटेल,सदस्य कैलास मढवे,ज्ञानदेव भागवत,राजू पटेल,विलास साळवे,आदी करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close