कोपरगाव तालुका
कोपरगाव बाजार पेठेबाबत हा निर्णय रहाणार सुरु-पो.नि.मानगावकर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बाजार पेठ व तालुक्यातील कोणतेही व्यवसाय पूर्ववत सुरु होणार नाही त्या बाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये.सध्या फक्त जीवनावश्यक वस्तूंच्यांच आस्थापना सुरू रहातील त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये नुकतेच केले आहे.
कोपरगावकरांनी आजपर्यंत जी शिस्त आणि सामंजस्य दाखविले आहे त्यामुळे आपण कोरोनाला कोपरगाव शहरात प्रवेश करू दिलेला नाही आणि ही बाब आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आणि इतरांसाठी मार्गदर्शक आहे आणि जो पर्यंत कोरोनाचा पूर्णपणे शेवट होत नाही तोपर्यंत आपणा सर्वांना अशीच शिस्त पाळावी लागणार आहे व त्यासोबत आपल्याला प्रशासनाच्या कायदेशीर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे-राकेश मानगावकर,पो.नि.कोपरगाव शहर पोलीस ठाणे.
देशात व राज्यात कोरोनाने कहर केलेला आहे.त्याताच कोपरगाव तालुक्यात दोन महिलांचे बळी गेले आहे.राज्यात अद्याप हि साथ थांबण्याचे नाव घेत नाही.मालेगाव व येवला हे कोरोना बाधित शहर नजीक आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.त्यातच काही राजकीय नेते आपल्या सवयीप्रमाणे जनतेत गैरसमज पसरवून आपल्या सत्तेच्या पोळ्या भाजून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे वारंवार उघड झाले आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.अनेक व्यापाऱ्यांची दुकाने बंद आहेत.त्यामुळे त्यांचे अर्थकारण थांबले आहे.हे वास्तव आहे.त्यामुळे आपली आस्थापने पूर्ववत सुरु व्हावे असे वाटणे स्वाभाविकच आहे.मात्र कोरोना विषाणूची साथ पाहता आज नागरिकांनी आपला जीव वाचविणे हाच आपला नफा समजणे गरजेचे आहे.या मानसिकतेचा काही राजकीय विकृती फायदा उचलू पाहत आहेत.त्याला कोपरगावचा अपवाद नाही.त्यातूनच काही संकेत संस्थळावर या बाबत चुकीचे व जनतेत गैरसमज पसरविणारे संदेश फिरत असल्याने तालुका प्रशासनाला विनाकारण कामाला लावल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटलें आहे की,पूर्वी शहरात स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आपल्या अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी बुधवार आणि रविवार हे दोन वार नेमून दिले आहे.त्याच वारी व वेळी बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी किंवा इतर व्यावसाईकांनी फक्त अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडावे. सध्या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात व लगतच्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना आपण कोपरगावकरांनी आजपर्यंत जी शिस्त आणि सामंजस्य दाखविले आहे त्यामुळे आपण कोरोनाला कोपरगाव शहरात प्रवेश करू दिलेला नाही आणि ही बाब आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आणि इतरांसाठी मार्गदर्शक आहे आणि जो पर्यंत कोरोनाचा पूर्णपणे शेवट होत नाही तोपर्यंत आपणा सर्वांना अशीच शिस्त पाळावी लागणार आहे व त्यासोबत आपल्याला प्रशासनाच्या कायदेशीर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. एक कोपरगावकर नागरिक म्हणून आपण सर्वजण प्रशासनाला निश्चित सहकार्य कराल असा आशावाद पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी शेवटी व्यक्त केला आहे.