कोपरगाव तालुका
प्रज्ञाशोध परीक्षेत कुंभारीतील विद्यार्थिनीचे यश

संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी युगांधर इंग्लिश मिडीयम स्कुल कुंभारीची माजी विद्यार्थिनी तसेच कोळपेवाडीच्या छत्रपती संभाजी विद्यालयातील इयत्ता ४ थी शिकत असलेली कु. ईश्वरी रामराव देवकर हिने प्रज्ञाशोध परीक्षेत लक्षवेधी यश मिळवले आहे.तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रज्ञाशोध परीक्षेत तीने राज्यात १९ वा तर जिल्हात १७ वा तर ती शिकत असलेल्या छत्रपती संभाजी विद्यालयात ३ रा क्रमांक पटकवला आहे. तिच्या या यशाबद्दल युगांधर इंग्लिश मिडियम स्कुलचे अध्यक्ष रमन गायकवाड यांच्यासह कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले उपसरपंच दिगंबर बढे, ग्रामपंचायत सदस्या किरण गायकवाड यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्या सह सर्व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.