जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या दोन आरोपींचा न्यायालयीन कोठडीचा अर्ज फेटाळला

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात मोठ्या आवाजात भोंगा लावून व मास्क न लावता सामाजिक आरोग्य धोक्यात आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केलेले शिवसेनेचे शिर्डी लोकसभा युवा संपर्क प्रमुख भैया तिवारी व त्याचा भाऊ यांना चौदा दिवस स्थानबद्ध करण्याच्या मागणीचा कोपरगाव शहर पोलिसानी दिलेला अहवाल कोपरगाव येथील न्यायालयाने फेटाळला आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय-२८) यांनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता.या प्रकरणी आरोपी भैया तिवारी व त्यांचा भाऊ बबलू तिवारी या दोघावर दाखल केला होता.व या बाबत कोपरगाव पोलिसानी आरोपींना कोपरगाव न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर करून आरोपीस चौदा दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी केली होती.व त्यांचे विरुद्ध पोलीस ठाण्याचे कागदपत्र व जुन्या दाव्यांचा संदर्भ देऊन त्यांना रमजानचे काळात जातीय तेढ निर्माण होईल अशी कारणे देऊन स्थानबद्ध करण्याची मागणी केली होती.

कोपरगाव शहरातील सुभाषनगर येथे साईबाबा मंदिरात सुनील तिवारी व त्याचा भाऊ बबलू तिवारी यांनी भोंग्यावर मोठ्या आवाजात देवी-देवतांची आरती लावून सार्वजनिक शांतता भंग केली.शिवाय आपल्या तोंडाला मास्क न लावता विनाकारण घराबाहेर पडून समाजाला व मानवाला धोका होईल असे व शहरात संचारबंदी आहे हे माहिती असताना विनाकारण बाहेर फिरून समाजास धोका पोहचेल असे कृत्य केले असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिसानी फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय-२८) यांनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता.या प्रकरणी आरोपी भैया तिवारी व त्यांचा भाऊ बबलू तिवारी या दोघावर दाखल केला होता.व या बाबत कोपरगाव पोलिसानी आरोपींना कोपरगाव न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर करून आरोपीस चौदा दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी केली होती.व त्यांचे विरुद्ध पोलीस ठाण्याचे कागदपत्र व जुन्या दाव्यांचा संदर्भ देऊन त्यांना रमजानचे काळात जातीय तेढ निर्माण होईल अशी कारणे देऊन स्थानबद्ध करण्याची मागणी केली होती.व त्या समर्थनार्थ कागदपत्रे दाखल केले होते.दरम्यान या बाबत आरोपींचे वकील अड्. जयंत जोशी यांनी पोलिसांचा अहवाल चुकीचा व खोटा असल्याचा युक्तिवाद करून पोलिसाची हि मागणी फेटाळली आहे.व पूर्वीचे सर्व न्यायालयाचे निकाल होऊन आरोपीस निर्दोष सोडून देण्यात आलेले आहे असा दावा केला होता.अड्.जयंत जोशी यांचा युक्तिवाद न्यायालयाने गृहीत धरून दोन्ही आरोपींची अटी व शर्तीवर सुटका असल्याची माहिती आरोपींचे वकील अड्.जयंत जोशी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close