कोपरगाव तालुका
…या गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे स्थानिक विकास निधीतून पुणतांबा रोड मारुती मंदिर ते देशमुख वस्ती या 40 लाख रूपयांच्या रस्त्याचे डांबरीकरण,नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत पुणतांबा रोड ते धोंडीराम गायकवाड वस्ती ते रेलवाडी मारुती मंदिर या 30 लाख रुपयांच्या रस्त्याचे खडीकरण व गावांतर्गत बाजारपेठ विकसित करून अंतर्गत 25 लाख रुपये खर्चाच्या रस्ते सिमेंट कॉन्क्रेटिकरण करणे अशा एकूण ९५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

स्थानिक विकास निधी म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात लहान विकासकामे करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी मिळणारा निधी होय.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात प्रत्येक आमदाराला आता प्रतिवर्षी सुमारे पाच
कोटींपर्यंत निधी मिळतो. ही कामे जिल्हा नियोजन समिती (डी.पी.डी.सी.) मार्फत सुचविली जातात.आ.आशुतोष काळे यांनी अशी कामे आपल्या मतदार संघात सुचवली होती.त्यात कोकमठाण येथील विविध कामांचा समावेश आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, दिलीप बोरणारे,सुरेश जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर,माजी संचालक बाळासाहेब बारहाते,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विजय रक्ताटे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढे,गोदावरी खोरेचे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक विजय थोरात, शिरीष लोहकणे,सुदाम लोंढे,सुनील लोंढे, दादासाहेब साबळे,शांताराम लोहकणे,संजय थोरात,अरविंद रक्ताटे,दिपक रोहम,ज्ञानेश्वर रक्ताटे,संजय थोरात,विजय रक्ताटे,भाऊसाहेब काशिद,अनंत रक्ताटे,विशाल जाधव, डॉ.आशिष डूबे,सिद्धार्थ लोहकणे,शिवाजी कराळे,शरद फटांगरे,मधुकर रक्ताटे,संभाजी देशमुख,संतोष लोंढे,बनेमिया सय्यद,प्रशांत मोरे,वाल्मीक कापे,संभाजी गायकवाड आदींसह बांधकाम विभागाचे रणजित तामखाणे,राजेंद्र रोहोम,ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील,राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



