जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्यरक्षक साहित्य वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

संवत्सर-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला असताना आपल्याही हद्दीत कोरोना विषाणूंचा शिरकाव होऊ नये यासाठी सर्वच ग्रामपंचायती सतर्क झाल्या असून त्यांनी आपल्या नागरिकांना सतर्क केले आहे.संवत्सर ग्रामपंचायत या बाबतीत मागे राहिली नसून त्यानींही गावात जंतुनाशक फवारणी करण्यासोबतच आपल्या ग्रामस्थांना आपले हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर व डेटॉल,व तत्सम साहित्याचे वाटप नूकतेच केले आहे.या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले असल्याने सर्वच प्रशासन सतर्क झाले आहे.मढीत तीन संशयित रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांत आणखी भीती निर्माण झाली आहे.नागरिकांत जागृती करण्यासोबतच जंतुनाशक फवारणी केली आहे.व त्यांना आपली वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साहित्यही तेवढेच महत्वाचे समजून त्या बाबत जागृती करून ते साहित्य ग्रामपंचायतीच्या वतीने नूकतेच वितरित करण्यात आले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५३ ने वाढून ती १७ हजार ३५७ इतकी झाली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार २०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे दोन बळी गेले असल्याने सर्वच प्रशासन सतर्क झाले आहे.मढी बुद्रुक येथे तीन संशयित रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांत आणखी भीती निर्माण झाली आहे.नागरिकांत जागृती करण्यासोबतच जंतुनाशक फवारणी केली आहे.व त्यांना आपली वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साहित्यही तेवढेच महत्वाचे समजून त्या बाबत जागृती करून ते साहित्य ग्रामपंचायतीच्या वतीने नूकतेच वितरित करण्यात आले आहे.त्याचा शुभारंभ ग्रामपंचायतीचे सरपंच आशा मेहेत्रे,उपसरपंच केशवराव भाकरे,सदस्य विवेक परजणे,ग्रामविकास,अधिकारी कृष्णकांत अहिरे,कर्मचारी मोहन सोनवणे,भरत साबळे,झाकीर भाई शेख,बाळासाहेब गायकवाड,सागर कांबळे आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.या उपक्रमाचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.ग्रामस्थांच्या सहकार्याबद्द्दल माजी उपसरपंच विवेक परजणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close