कोपरगाव तालुका
..ते अपायकारक बोगदे काढण्यास कोपरगावात प्रारंभ !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम, अथवा प्लास्टिकचे बोगदे यांचा वापर केला जात होता. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये अशी सूचना केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेने हे अपायकारक बोगदे तत्काळ हटविण्याचा निर्णय घेतला आहे.व त्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.
कोपरगाव शहरात या टनेलद्वारे फवारणी पेक्षा त्यावरील नेत्यांच्या कुठल्यानी निवडणूका समोर नसताना महाकाय आकारातील स्वतःच्या छबी असलेल्या जाहिराती नागरिकांना उबग आणणाऱ्या ठरल्या होत्या.पश्चिम महाराष्ट्रातील साखरसम्राट अशा जाहिराती करण्याच्या संधी शोधत असतात त्यातून त्यांना कोरोना मुळें नामी संधी मिळाली होती ती राज्याच्या आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी घालविल्याची चर्चा नागरिकांत मिश्कीलपणे सुरु आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५३ ने वाढून ती १७ हजार ३५७ इतकी झाली असून ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार २०० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २२३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या कोरोना साथीपासून बचाव करण्यासाठी काही नागरिक व विविध सामाजिक,स्थानिक स्वराज्य संस्था,व विविध राजकीय नेते आदींनी संकटात संधी शोधत आपल्या प्रतिमामंडन करण्याची संधी शोधत हे बोगदे बनवले होते.त्यांना या शासन आदेशाचा मोठा फटका बसला आहे.मुख्यमंत्र्यांनी तर दोन केळी आठ जण वाटप करण्याच्या मानसिकतेवर कठोर टीका केली होती त्याचाच हा प्रकार आहे.जिल्हाधिकऱ्यानी अशा स्व प्रतिमा पूजक नेत्याना असे मदतीचे फोटो काढून त्याचे सामाजिक संकेतस्थळावर टाकण्यास बंदी घातली होती.
या शासन आदेशानुसार आज सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून राज्यात या प्रकारच्या यंत्रणांचा वापर न करण्याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा कृत्रिम बोगदे तयार करून त्याचा वापर होत असून त्याद्वारे व्यक्ती किंवा समुहावर वापर केला जात होता.विशेष म्हणजे कोपरगाव नागरपरिहदेनेही हा प्रयोग केला होता.त्या पाठोपाठ कोपरगावचे आ. आशुतोष काळे,माजी आ. कोल्हे यांनीही त्याचे अंधानुकरण चालवले होते. यासाठी वापरले जाणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून अशा फवारणीमुळे कोरोना जंतुसंसर्ग रोखला जातो याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे राज्यात अशा फवारणी यंत्रांचा वापर न करण्याच्या सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना आटील यांनी पत्राद्वारे नुकत्याच दिल्या होत्या.