निघोज प्रतिनिधी दी. 14 मार्च
नव्या जुन्यांचा समन्वय साधीत लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात विक्रमी मताधिक्य देण्याचा आमचा संकल्प असल्याची माहिती संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांनी दिली आहे. डॉ विखे पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावर वराळ यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. वराळ यावेळी म्हणाले गेली दोन वर्षापासून डॉ. विखे हे लोकसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याने या गटातील लोकनेते माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांच्या समवेत काम करीत आहेत. विखे पाटील यांचे सर्व पक्षात कार्यकर्ते आहेत ही त्यांची सर्वाधिक जमेची बाजू आहे. कोनतेही सार्वजनिक किंवा वैयक्तिक काम असले आणी डॉ. विखे पाटील यांना संपर्क केल्यानंतर काम होणारच असे खात्रीशीर युवानेते म्हणून त्यांचा नगर लोकसभा मतदारसंघातील नावलौकीक त्यांनी वाढवीला आहे. म्हणून कोनत्या पक्षाची उमेदवारी यापेक्षा डॉक्टर सुजय विखे पाटील हाच आमचा पक्ष हीच मानसिकता सर्व कार्यकर्त्यांची आहे. डॉ. विखे पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. या मतदारसंघातील साडेसातशे गावात त्यांचा संपर्क आहे आरोग्य शिबीराच्या माध्यमातून लाखो रुग्णांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. प्रत्येक गावातील प्रश्नांची जाण त्यांना असल्याने त्यांचा प्रचाराचे दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. डॉ. सुजय विखे पाटील यांची वैयक्तिक ओळख त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून झाल्याने ते भाजपाचे खासदार म्हणून मोठय़ा मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री वराळ यांनी व्यक्त केली आहे.