जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेने ..त्या मागणीची घेतली दखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोना प्रतिबंधक लस तयार नसल्याने डॉक्टरांसह परिचारिका,आरोग्यसेवक आदी प्रत्येक जण रुग्णांचा जीव वाचविण्याआधी आपला जीव वाचविण्यासाठी वैयक्तिक संरक्षण कवचाची (पी.पी.ई. किट) मागणी करत असताना आता रुग्णवाहिका चालकांनीं,’आम्हाला पहिल्यांदा रुग्ण उचलावा लागत असल्याची भूमिका घेत (पी.पी.ई. किट ) वैयक्तिक संरक्षण कवचाची मागणी रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली होती त्याची दखल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी घेतली असून एक पी.पी.ई. किट खोकले यांना प्रदान केला आहे.त्यांनी याबाबत कोपरगाव पालिकेचे आभार मानले आहेत.

आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या वृत्ताची दखल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नुकतीच घेऊन रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना वैयक्तिक संवरक्षक कवच प्रदान केले आहे.त्यांचा त्या बाबतचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे.त्यांनी या दोन्ही अधिकारी पदाधिकारी यांचे आभार मानले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ३५५ ने वाढून ती १४ हजार ७०७ इतकी झाली असून ४९६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती १६५ ने वाढून संख्या ३ हजार ३२० वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.देशभरात अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.रुग्णवाढ गत दोन-तीन दिवसात कमी होत असली तरी ती थांबलेली नाही.त्यामुळे नागरिकांसह कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर,परिचारिका,आरोग्य सेवक,आरोग्य कर्मचारी यांच्यातही भीतीचे वातावरण अद्याप टिकून आहे.उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टर,परिचारिका यांना उपचार करताना वैयक्तिक संरक्षण कवच नसल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे.व तो रास्त आहे.काहींनी अनेक ठिकाणी या मागणीसाठी आंदोलने केली आहे.मात्र याबाबत देशभरात या पी.पी.ई. किटची उपलब्धता कमी असल्याने उपचार करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असताना आता रुग्णवाहिका चालकांनी कोरोनासह कोणताही रुग्ण उचलताना सर्व प्रथम आम्हालाच घटनास्थळी जावे लागत असते त्यामुळे आमच्या जीविताला सर्व प्रथम धोका आहे असा रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांनी केला होता.त्यामुळे सरकारने आमचा डॉक्टर व आरोग्य सेवकांसारखा किमान पंचवीस लाखांचा विमा उतरावा व आम्हाला पी.पी.ई. किट वापरण्यास तरतूद कारवाई अशी मागणीही त्यांनी शेवटी केली होती.त्या वृत्ताची दखल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी नुकतीच घेऊन रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना वैयक्तिक संवरक्षक कवच प्रदान केले आहे.त्यांचा त्या बाबतचा आंनद गगनात मावेनासा झाला आहे.त्यांनी या दोन्ही अधिकारी पदाधिकारी यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close