जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात खरेदीसाठी एकच दिवस द्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात व शिंगणापूर आदी दोन ठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडून त्यात त्याचे दुर्दैवी निधन झाले आहे.हि बाब फार गंभीर असून नागरिकांनी आता तरी सामाजिक अंतर पाळणे फार गरजेचे झाल्याने नागरिकांना किराणा व भाजीपाला खरेदीसाठी आठवड्यातून फक्त एकच दिवस राखून ठेवावा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुन्हा एकदा कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे नुकतीच केली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात दोन जेष्ठ महिलांचा कोरोना व सारी साथीत मृत्यू झाला आहे हि फारच गंभीर घटना मानली जात आहे.तरीही कोपरंगावकर नागरिक या कोरोनाच्या साथीला गंभीर मानायला तयार नाही हि धक्कादायक घटना आहे. दोन वेळी पालिकेने भाजीपाला व किराणा बाजारासाठी संधी दिली त्यावेळी नागरिक व महिला यांनी सामाजिक अंतराचे संदेश पाळण्यात मोठी कसर केल्याचे उघड झाले आहे.त्यातून नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत नसल्याचे उघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वहाडणे यांनी हि चिंतायुक्त मागणी केली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २३१ ने वाढून ती १३ हजार ६६३ इतकी झाली असून ४५० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती १६५ ने वाढून संख्या ३ हजार २०२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १९४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १ ने वाढून २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव शहर व तालुक्यात दोन जेष्ठ महिलांचा कोरोना व सारी साथीत मृत्यू झाला आहे हि फारच गंभीर घटना मानली जात आहे.तरीही कोपरंगावकर नागरिक या कोरोनाच्या साथीला गंभीर मानायला तयार नाही हि धक्कादायक घटना आहे. दोन वेळी पालिकेने भाजीपाला व किराणा बाजारासाठी संधी दिली त्यावेळी नागरिक व महिला यांनी सामाजिक अंतराचे संदेश पाळण्यात मोठी कसूर केल्याचे उघड झाले आहे.त्यातून नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत नसल्याचे उघड झाले आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वहाडणे यांनी हि चिंतायुक्त मागणी केली आहे.

त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,आजही कोपरगाव शहरात सर्वच प्रचंड गर्दी-वर्दळ आहे.दररोज जरी व्यवहार सुरू ठेवले तरी गर्दि होणारच आहे.नगर जिल्हा आता रेड झोनमध्ये जाहीर झाला आहे.शहरात कोरोनाचा बळीही गेलेला आहे तरीही आपल्या नागरिकांना या बाबीचे पाहिजे तेव्हढे गांभीर्य नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. सामाजिक अंतराचा फज्जा उडवला जात आहे.त्यामुळे शहरात व तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कधीही वाढू शकतो असे वाटते.जीवनावश्यक वस्तू मिळणे गरजेचे असते तरी त्याहीपेक्षा नागरिकांचे जीवित रहाणे जास्त महत्वाचे आहे.काहीसा त्रास,तुटवडा सहन करावा लागला तरी चालेल.जीवनावश्यक वस्तू आठवड्यातून फक्त एकदाच मिळतील असे नियोजन करणे फारच गरजेचे आहे.अनेकांना माझे म्हणणे पटणारे नाही तरीही येणाऱ्या भयावह परिस्थितीची जाणीव ठेवून निर्णय घ्यावा व कठोरपणे राबवावा अशी अपेक्षा नगराध्यक्ष वहाडणे यांनी तहसीलदार यांचेकडे शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close