जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कांदा काढणी करताना दक्षता घेण्याची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-( प्रतिनिधी)
सध्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरू आहे. त्यात काही मजुर स्त्री-पुरुष तोंडाला मास्क, चारपदरी रूमाल, उपरणे, ओढणी न वापरता कांदा काढणी करत आहेत. त्यावेळी ओल्या कांद्याची वाफ, धुळ, तोंडात गेल्याने त्यांना सर्दी, खोकला यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कुंभारी ग्राम समितीच्या वतीने मजुरांना काळजी घ्यावी असे आवाहन कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले यांनी नुकतेच केले आहे.

वर्तमान काळात कोरोना विषाणूमुळे संपुर्ण देशात सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच कांदा हा चाळीत साठवण करताना फोरेटचा व इतर रासायनिक पावडरचा वापर होत असल्याने ते श्वसनाद्वारे नाका तोंडात गेल्याने कांदा भरणारे शेतकरी व मजुर यांना श्वसनाच्या आजाराची लक्षणे ग्रामीण भागात दिसत आहे.

वर्तमान काळात कोरोना विषाणूमुळे संपुर्ण देशात सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच कांदा हा चाळीत साठवण करताना फोरेटचा व इतर रासायनिक पावडरचा वापर होत असल्याने ते श्वसनाद्वारे नाका तोंडात गेल्याने कांदा भरणारे शेतकरी व मजुर यांना श्वसनाच्या आजाराची लक्षणे ग्रामीण भागात दिसत आहे.यात डोळ्यांची जळजळ,नाक चोंदणे,घसा खवखवणे,काही दिवसाने ताप येणे असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे शेतकरी बंधूनी स्वतः व आपले मजुर यांनी मास्क बांधणे, सामाजिक अंतर ठेवणे व सॅनिटायझरचा वापर करणे,वेळोवेळी साबणाने हात धुणे आदींचा अवलंब करावा.कांदा साठवणूक करताना स्वताची तसेच इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

याकामी ग्राम समितीच्या वतीने सरपंच प्रशांत घुले,उपसरपंच दिगंबर बडे,ग्रामसेवक संजय डवले,निलेश बिबवे,सहाय्यक पोलीस पाटील उल्हास मेढे, तलाठी सुनील साबने,ललित निळकंठ,वसंत घुले,बाळासाहेब निळकंठ,आशिष थोरात यांनी परीश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close