जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

….या ग्रामपंचायतीत खांदेपालट,मोठी चर्चा !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील विद्यमान सरपंच पूर्वाताई गुंजाळ यांचेसह ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोरे,कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ,अशोक सोनवणे,चंद्रकला सोनवणे,साखरबाई सोनवणे,गजानन सोनवणे,रविंद्र गुंजाळ यांनी आज आ.आशुतोष काळे यांच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती कानिफनाथ गुंजाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

काकडी येथील विद्यमान सरपंच पूर्वाताई गुंजाळ यांचेसह ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मोरे,कार्यकर्ते कानिफनाथ गुंजाळ,अशोक सोनवणे आदींनी पक्ष प्रवेश केला तो क्षण.

त्या वेळच्या काकडी येथील ग्रामसभा आणि विमानतळ यांच्या सभा यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती.रस्ते पिण्याचे पाणी,शाळा,त्यांच्या इमारती,गटारी आदी पायाभूत सुविधा देण्याचे राज्य विमानतळ प्राधिकरणाने कबूल केले होते.राज्यात भाजप सरकार येऊन दहा वर्षे उलटूनही अद्याप काकडी ग्रामपंचायतीला काहीही पदरी पडलेले नाही.शिवाय विमानतळाकडे असलेले पट्टीही ते देऊ शकलेले नाही.या विमानतळास तसा ठराव होऊनही काकडीचे नाव देऊ शकले नाही.

   कोपरगाव तालुक्यात विमानतळ व्हावे यासाठी जनमंगल ग्रामविकास संस्थेने दिशादर्शक काम करून येथील तरुणांना व ग्रामस्थांना दिशा दिली होती.दैनिक गावकरीने याबाबत सविस्तर क्रमशः लेख व वृत्त प्रसिद्ध करून येथील दुष्काळी जनतेत जागृती करून त्यांना न्याय मिळवून दिला होता.परिणामी अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना सन-२००९ साली याचे भूमिपूजन मोठा डामडौल करून ढोल-ताशे बडवून संपन्न झाले होते.यातून काकडी गावातील समस्या संपतील असा आशावाद होता.त्यावेळच्या ग्रामसभा आणि विमानतळ यांच्या सभा यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती.रस्ते पिण्याचे पाणी,शाळा,त्यांच्या इमारती,गटारी आदी पायाभूत सुविधा देण्याचे कबूल केले होते.राज्यात भाजप सरकार येऊन दहा वर्षे उलटूनही अद्याप काकडी ग्रामपंचायतीला काहीही पदरी पडलेले नाही.शिवाय विमानतळाकडे असलेले पट्टीही ते देऊ शकलेले नाही.या विमानतळास तसा ठराव होऊनही काकडीचे नाव देऊ शकले नाही.याबाबत मागील भाजप आमदारांनी अनेक वेळा शब्द देऊनही तो सरकार आणि त्यांनी पाळला नाही.

   दरम्यान या काकडी ग्रामपंचायतीची सदरची पट्टी जवळपास आठ कोटींवर जाऊन ठेपली आहे.मात्र कोणालाही त्याचे सोयर सुतक नाही.निवडणुका आल्या की आश्वासने देताना चंद्र,सूर्य,नदी,नाले सर्व काही मंजूर केले जाते मात्र निवडणुका संपल्या की त्या गावचे कोणीही राहत नाही हा दांडगा अनुभव काकडीकरांना आलेला आहे.त्यामुळे त्यांनी आता खांदे पालट करण्याचा निर्णय घेतला आहे व आमदार आशुतोष काळे यांचे बोटं धरले आहे.वास्तविक काळे आणि कोल्हे शिवाय थोरात आणि विखे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असताना त्यांनीं असा निर्णय का घेतला हे समजण्यास मार्ग नाही.निळवंडे धरण आणि त्याचे कालवे हे याचे उत्तम उदाहरण आहे.५५ वर्षे उलटत आले आहे तरीही ही मंडळी दुष्काळी जनतेला पाणी देऊ शकलेली नाही.निळवंडे कालवा कृती समिती जर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात गेली नसती आणि रस्त्यावरील लढा केला नसता तर आजही हे पाणी मिळाले नसते हे वास्तव आहे.तरीही ही मंडळी खांदेपालट करत असेल तर त्यांचे हाती काही मोठे घबाड लागेल अशा भ्रमात रहाणे त्यांच्यासाठी आणि गावांसाठी घातक ठरणार आहे.

   सदर प्रसंगी प्रभाकर गुंजाळ,नंदकिशोर औताडे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.आ.आशुतोष काळे गटाने त्यांचे जोरदार स्वागत केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close