जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या कारखान्याच्या ऊसास १२५ रुपये अंतिम दर जाहीर

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

कर्मवीर काळे कारखाना ऊस उत्पादकांना १२५ रुपये मेट्रिक टणाने अंतिम दर दिला जाणार असून लाभक्षेत्रातील व बाहेर असा भेदभाव आपण केला नाही करणार नाही.कारखाना कामगारांना २० टक्के बोनस दिला जाणार असल्याची घोषणा आ.आशुतोष काळे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

“निवडणुका आल्या की,रोजगार मेळावे घ्यायचे व लोकांना नादी लावण्याचे काम सुरू असून जनता या खोट्या गप्पा ऐकणार नाही; तुम्ही खोटे बोलून काही काळ फसवू शकाल सदासर्वकाळ फसू शकणार नाही असे सांगून माजी आमदार कोल्हें व त्यांचे पुत्र विवेक कोल्हेंचे ढोंग उघडे करण्याचा प्रयत्न केला आहे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.

   कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या ७० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपण समारंभ आज माजी आ.अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर गाहिनाजी चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे,कारभारी आगवन,काकासाहेब जावळे,सुधाकर रोहोम,साई संस्थानचे माजी विश्वस्त संभाजी काळे,संचालक नारायण मांजरे,गौतम बँकेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कोते,ऍड.गिरीश लोहकणे,बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुरेश जाधव,संचालक दिनार कुदळे,सोमनाथ घुमरे,प्रवीण शिंदे,बाळासाहेब आभाळे,सचिन रोहमारे,एम. टि.रोहमारे,इंदुबाई विष्णू शिंदे,कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,शेतकी अधिकारी,चीफ केमिस्ट,स्थापत्य अभियंता,आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद,शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी हंगाम पूर्व बॉयलर प्रदिपंन संपन्न झाले होते. त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपल्या विधानसभेची निवडणूक झाली २१ऑक्टोबरला  २०१९ रोजी मतमोजणी होती.त्यात आपण दिलेल्या योगदानामुळे विजय मिळाला होता.आता निवडणुका दिवाळीनंतर होणार आहे.२-४ दिवसात आचारसंहिता सुरू होणार आहे.निवडणुकीला सामोरे जायचे आहे.गळीत हंगामाचा सामना करायचा दोन्ही मिलचे काम पूर्ण केले आहे.यंदा शेतकी विभागाने चांगले नियोजन केले आहे.कार्यक्षेत्रातील ऊस सर्वेक्षण केले आहे.ऊसगाळपाचे ६.५ टणाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे.ऊस पळवापळवी होणार आहे.आपण ठेवलेले हे उद्दिष्ट्य कमी आहे.९-९.५ टन गाळप होणे अपेक्षित होते.लाभक्षेत्रावरील व खालचे धरणे भरली आहे.सर्व कालव्यांचे पाणी मिळाले आहे.पिण्याच्या पाण्याची कमतरता नाही.५००-६०० मी.मी.पाऊस झाला असला तरी बाहेरून ऊस आणावा लागणार आहे.मुबलक पाणी असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करावी असे आवाहन केले आहे.पश्चिमेचे समुद्रास वाहून जाणारे पाणी सरकार वळवणार आहे.शेतकऱ्यांनी ऊस वाणाचा अनुभव घेऊन लागवड करावी.जास्त पाण्याने ऊस वजनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.ठिबकचा वापर उसलागवडी साठी करा.ऊस तोडीसाठी हार्वेस्टिंग मशीनचा वापर करावा लागेल,त्यासाठी दोन सऱ्यातील अंतर वाढवा.उसावरील हुमनी,पांढरी माशीचे नियंत्रण करा.७० वर्षात कारखाना ८०० टनावरून ८ हजार टनावर नेला आहे.

   सदर प्रसंगी आपले विरोधक माजी आ.कोल्हे यांच्यावर टीका करताना विरोधकांकडून ,”प्रत्येक गावाला तीस कोटी आले का असा बालिश सवाल केला जात आहे.भरवस फाटा रस्त्यास मोठा निधी आला तो कोणत्या हिशेबात धरायचे असा सवाल करून विवेक कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.आगामी काळात या बाललीला अधिकच वाढणार आहे.त्यावर जास्त विश्वास ठेवू नका.निवडणुका आल्या की,रोजगार मेळावे घ्यायचे व लोकांना नादी लावण्याचे काम सुरू असून जनता या खोट्या गप्पा ऐकणार नाही असे त्यांनी आवाहन करून तुम्ही खोटे बोलून काही काळ फसवू शकाल सदासर्वकाळ फसू शकणार नाही असे सांगून कोल्हेंचे ढोंग उघडे करण्याचा प्रयत्न केला आहे.आगामी काळात निवडणुका आणि कारखाना गळीत हंगाम असे दोन्ही पातळ्यांवर यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला सर्व कामे होतील असे नव्हे पण जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आवाहन केले आहे.

  सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close