जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या गावांचे देखील आपल्यावर ऋण-आ.काळेंची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी मला जनसेवेची संधी दिली यामध्ये कोपरगाव मतदार संघातील कोपरगाव शहरासह प्रत्येक गावांचे माझ्यावर ऋण असून त्याप्रमाणे माझी जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुखचा देखील सहभाग आहे. विकास कामांच्या माध्यमातून या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

माहेगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पणप्रसंगी आ.आशुतोष काळे व मान्यवर

“माहेगाव देशमुखसह,कोळपेवाडी,कोळगाव थडी,सुरेगाव,शहाजापूर,मळेगाव थडी,कुंभारी,धारणगाव,हिंगणी,मुर्शतपूर,सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य जवळपास पाच कोटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण झाले असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,सरपंच सुमन रोकडे,उपसरपंच भास्करराव काळे,माहेगाव देशमुख सेवा सह.सोसायटीचे अध्यक्ष मधुकर काळे,उपाध्यक्ष यशवंत देशमुख,संजय काळे,दिपक पानगव्हाणे,बाळासाहेब काळे,भास्कर लांडगे,रोहिणी जाधव,तृप्ती पानगव्हाणे,कल्पना पानगव्हाणे,शितल रोकडे,छाया काळे,मिनाबाई पवार,रविंद्र काळे,के.पी. रोकडे,भीमराव मोरे,पंचायत समिती अभियंता जगताप,ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके, ठेकेदार श्रीकांत काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
  सदर प्रसंगी ते पुढे बोलताना म्हणाले की,”मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांचे विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य असून प्रत्येक गावाला विकासाच्या बाबतीत त्या गावात सत्ता असो वा नसो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून त्याप्रमाणे माहेगाव देशमुखच्या देखील विकासाच्या समस्या सोडविल्या आहेत.माहेगाव देशमुख येथील माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून  केलेल्या पाठपुराव्यातून श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला आहे.माहेगाव देशमुखसह,कोळपेवाडी,कोळगाव थडी,सुरेगाव, शहाजापूर,मळेगाव थडी,कुंभारी,धारणगाव,हिंगणी,मुर्शतपूर,सोनारी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य जवळपास पाच कोटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण झाले असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.त्यामुळे रहदारी वाढली जावून त्याचा काही प्रमाणात छोट्या मोठ्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे.याप्रमाणे प्रत्येक गावाच्या विकासाला निधी देण्यासाठी महायुती शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती आ.काळे यांनी शेवटी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close