कोपरगाव तालुका
कोपरगावात…हा नेता साधणार जनतेशी संवाद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या विकासाचे मागील अनेक वर्षापासुनचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा आ.आशुतोष काळे यांनी प्रयत्न केला असून आगामी काळात कोपरगावकरांच्या विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे दुपारी ३.०० वाजता ते कोपरगावकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी चार वर्षात ०२ हजार ३०० कोटीचा निधी मिळविला असल्याचा दावा केला आहे.त्यातील कोपरगाव शहराच्या विकासासाठी देखील जवळपास ३०० कोटी निधी दिला असल्याचे त्यांचे समर्थकांचे म्हणणे आहे.वर्षानुवर्षापासून कुणालाही न सोडविता आलेला अत्यंत महत्वाचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावून दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.
त्याबरोबर कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करतांना सर्व प्रमुख रस्ते,शासकीय इमारती,ग्रामीण पोलीस ठाणे इमारत व कर्मचारी वसाहत,सामाजिक सभागृह,अमरधाम,कब्रस्थान विकास,उद्यान विकास अशा विविध विकास कामांना कोट्यावधी निधी दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर असून बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे.या सर्व सुरू असलेल्या विकास कामांसंदर्भात तसेच प्रलंबित असलेल्या विकास कामाच्या प्रश्नांसंदर्भात कोपरगाव शहरवासीयांच्या सूचना जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद आयोजित केला आहे. शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या संवाद कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ. काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.