शैक्षणिक
…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे.येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
“परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी भयमुक्त रहाणे गरजेचे आहे.कोणतेही दडपण न आणता कॉपीमुक्त परीक्षा देण्याची वृत्ती अंगीकरली पाहिजे”-राजेश परजणे,अध्यक्ष,महानंद,मुंबई.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षा जवळ असल्या असताना कोपरगाव नजीक असलेल्या संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयाच्या बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला असून त्या वेळी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी व महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,गट शिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख, माजी केंद्र प्रमुख दिलीपराव ढेपले प्रा.दिपक कदम,प्रा.लक्ष्मण पुलाटे,प्रा.नानासाहेब माने,प्रा.जाकीर पठाण,प्रा.अनिल दरवडे,प्रा.नीता कोताडे,प्रा.अमोल परजणे,प्रा.रुपाली आहेर,प्रा.ज्ञानेश्वर गागरे,प्रा.किशोर करपे,प्रा.सुयोग चिंधे,निलेश शिंदे,सौरभ नळे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती शबाना शेख यांनी परीक्षेची तयारी,वेळेचे नियोजन आणि अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले तर केंद्र प्रमुख दिलीपराव ढेपले यांनी शिक्षणाचे व परीक्षेचे महत्व पटवून दिले.विद्यार्थीनी पायल गायकवाड,प्रियंका कोतकर,साक्षी जामदार,रुपाली भवर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज सदाफळ यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन कु.गायत्री खटकाळे व रेणुका कोल्हे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.दीपक कदम यांनी मानले आहे.