शैक्षणिक
…या विदयालयात दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील इयत्ता दहावी मधील विदयार्थीचा निरोप तथा सदीच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
माध्यमिक शाळेतील शिक्षणानंतर परीक्षेसाठी जाण्यासाठी आयुष्यात येणारा प्रसंग मोठा भाऊक असतो त्यासाठी बऱ्याच वला अनेकांना आपल्या भावना आवरताना अवघड जात असल्याचा अनुभव सार्वत्रिक आहे असाच अनुभव कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात नूकताच घडला आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा बी.एड.काॕलेजचे प्राचार्य दादासाहेब मोरे हे उपस्थित होते.
सदर प्रसंगी अमेरीका येथे स्थायिक असलेले माजी विदयार्थी सचिन भाबड,दीलीप तुपसैंदर,विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,राजेश ठोळे आदीनी विदयार्थीना एस.एस.सी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी दहावीतील विद्यार्थी कु.आरती म्हस्के,कु.सिध्दी चव्हाण,वैष्णवी नागुडे,रामेश्वर निंबाळकर,सार्थक वाघ,ओंकार कुहीटे आदि विदयार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी मानले आहे.