जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

रब्बी आवर्तनातील शिल्लक पाणी…या शहराला द्या-कृती समितीची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामात उशिरा पाणी सोडून जलसंपदा विभागाने अन्याय केला आहे.व आवर्तन कालावधी कमी करून रब्बीचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याने सदर पाणी कोपरगाव शहराला द्यावे व शहरातील आवर्तनाचा कालावधी कमी करावा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने नाशिक जलसंपदा विभागाकडे नुकतीच केली आहे.

“कोपरगाव पालिकेचे तलाव पाण्याअभावी खपाटीला गेल्याने सदर आवर्तन जाहीर केल्या प्रमाणे जानेवारीत सोडणे अपेक्षित असताना ते डिसेंबर मधेच सोडावे लागले होते.ते २६ डिसेंबर २०२२ रोजी दिल्यामुळे पाण्याची प्रस्तावित ०३ टि.एम.सी.पैकी बऱ्याच पाण्याची बचत झाली आहे.सदर आवर्तन १३ जानेवारी रोजी बंद झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी बचत झाली आहे.ते पाणी शहरात दिले तर दोन वर्तनातील कालावधी कमी होण्यास मदत मिळणार आहे”-तुषार विध्वंस,कार्यकर्ते,शेतकरी कृती समिती,कोपरगाव तालुका.

कोपरगाव,राहाता,सिन्नर,श्रीरामपूरसह गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात या वर्षीं मुबलक पर्जन्य झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी रब्बीचे जास्त आवर्तन मिळेल अशी अपेक्षा होती.मात्र झाले उलटेच आहे.या वर्षी जलसंपदा विभागाने आवर्तन वाढीव दिले तर नाही पण उलट रब्बीचे आवर्तन कमी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.या आधीच शेतकऱ्यांनी जलसिंचनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथे घ्यावी अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे जलसंपदा विभाग व राजकीय नेत्यांनी दूर्लक्ष केले आहे.गत हंगामात दि.१६ मे २०२२ रोजी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात घ्यावी अशी कळकळीची मागणी केली होती.त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला होता.मात्र प्रत्यक्ष कृती करण्याच्या वेळी मात्र या विभागाने शेतकऱ्यांना अंगठा दाखवला आहे.त्यामुळे तालुक्यात जलसंपदा विभागाच्या विरुद्ध शेतकऱ्यांचा अच्छा-खांसा राग आहे.

उशिरा रब्बीचे आवर्तन देण्याचा निर्णय घेऊन एक आवर्तन रब्बीचे उन्हाळ्यात लोटून शेतकऱ्यांचे आधीच आर्थिक नुकसान झाले आहे.हे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार असतांना वर्तमान लोकनेते आपण आवर्तन मंजूर करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे.या बाबत राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी प्रवीण शिंदे यांनी त्यावेळी केली होती.मात्र यावर तालुक्यातील नेत्यांनी,’किसी की एक ना सुनी’ त्यामुळे रब्बीचे वर्तन जिरविण्यात नाशिक जलसंपदा विभाग राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने यशस्वी झाला आहे.रब्बीचे आवर्तन नोव्हेंबर मध्ये सोडणे गरजेचे असतांना तो उशिरा सोडले आहे.त्यामुळे रब्बी पिकांचा दोन महिन्याचा हंगाम तब्बल दोन महिन्यांनी वाया गेला हे उघड आहे.त्यामुळे ऊस लागवड कमी झाली असल्याचा आरोप समितीने केला आहे.

दरम्यान कोपरगाव पालिकेचे तलाव पाण्याअभावी खपाटीला गेल्याने सदर आवर्तन जाहीर केल्या प्रमाणे जानेवारीत सोडणे अपेक्षित असताना ते डिसेंबर मधेच सोडावे लागले लागल्याचा आरोप कृती समितीने केला आहे.तो २६ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आवर्तनामुळे पाण्याची प्रस्तावित ०३ टि.एम.सी.पैकी बऱ्याच पाण्याची बचत झाली आहे.सदर आवर्तन १३ जानेवारी रोजी बंद झाले नव्हे लवकर करण्याची नामुष्की जलसंपदा विभागावर आली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी बचत झाली आहे.त्यामुळे वाचलेले पाणी जलसंपदा विभागाने कोपरगाव साठवण तलावासाठी वापरावे अशी मागणी कालवा शेतकरी कृती समितीने केली आहे.त्यामुळे शहरास सहा दिवसाड दिले जाणारे पाणी आवर्तन कमी होण्यास मदत मिळणार आहे.तशा आशयाचे निवेदन नुकतेच कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीने जलसंपदा विभागाला दिले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे तिरोडा विधानसभा संपर्क प्रमुख प्रविण आप्पासाहेब शिंदे,मनसे उपजिल्हाध्यक्ष संतोष कांतीलाल गंगवाल,शेतकरी कार्यकर्ते तुषार चारुचंद्र विद्वांस,लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अँड.नितीन पोळ,भुमिपुत्र फौडेशनचे निसार शेख,मनसे दिव्यांग सेनेचे अ.नगर जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,कोपरगाव कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे,मनसे कोपरगांव तालुकाध्यक्ष अनिल शिवाजी गायकवाड आदीं मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close