जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय कार्यशाळा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील “सावित्रीबाई फुले विद्यापीठ व कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’ आंतरविद्याशाखीय शिक्षण’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा येत्या १४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदर कार्यशाळेत देशपातळीवरील अनेक उच्च शिक्षणतज्ञ ‘आंतरविद्याशाखीय शिक्षण,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी,भारतीय ज्ञान-अभ्यास परंपरा व भारतीय भाषा,संस्कृती आणि परंपरा’आदी विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

याबाबत पुढे बोलताना ये म्हणाले की,”कोपरगावचे माजी आ.के.बी.रोहमारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी तर्फे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.त्यापैकीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने हा एक उपक्रम संपन्न होत आहे.या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,अंमलबजावणी विभागाचे अध्यक्ष व प्राचार्य विजय जोशी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यशाळेत पुणे विद्यापीठ विज्ञान विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड,केळकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.एम.बी.कुरूप,देवगिरी कॉलेज,औरंगाबादचे अंतर्गत हमी कक्षाचे समन्वयक डॉ.विष्णू पाटील,शिरूर कॉलेजचे प्राचार्य के.सी.मोहिते,मुंबई येथील राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाणाचे वरिष्ठ सल्लागार डॉ.प्रमोद पाब्रेकर व इतर देशपातळीवरील अनेक उच्च शिक्षणतज्ञ ‘आंतरविद्याशाखीय शिक्षण,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी,भारतीय ज्ञान-अभ्यास परंपरा व भारतीय भाषा,संस्कृती आणि परंपरा’ आदी विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या कार्यशाळेत वरिष्ठ महाविद्यालयातील विशेषतः देशभरातील प्राध्यापक,शिक्षण तज्ञ,अभ्यासक व संशोधक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close