शैक्षणिक
कोपरगावातील…या गुरुकुलाचे ७६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे ७६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असल्याची माहिती हाती आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये ४८ व तयारी वर्गातून १० असे एकुण ५८ विद्यार्थ्यांसह ग्रामिणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये १५ व तयारी वर्गातून ३ असे एकुण १८ विद्यार्थ्यासह ग्रामीणमध्ये जिल्हयात प्रथम स्थानी असण्याचा मान पुन्हा एकदा आत्मा मालिकने पटकविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची मेहनत,विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पण आणि मिशन पुर्नवैभव अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती आहे.तसेच आजपर्यंत ४५९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा विक्रम गुरुकुलाने साकारला असून सातत्यपूर्ण गुणवत्तेचे सलग नववे वर्ष असल्याची प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभय सुनिल मोहिते राज्यात १० व्या स्थानी, विनय वासुदेव शिरसाठ राज्यात ११ व्या स्थानी असून आजपर्यंत १० विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे,विभाग प्रमुख रमेश कालेकर,सागर अहिरे,मिना चव्हाण,सचिन डांगे,रविंद्र देठे,पर्यवेक्षक नितीन अनाप,अनिल सोनवणे,सुनिल पाटील,विषय शिक्षक राहुल जाधव,अनिता कोल्हे,रविंद्र धावडे आदींचे मागर्दशन लाभले होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष भगवानराव दौंड,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी अभिनंदन केले आहे.