जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

उत्तम शैक्षणिक सुविधा देणारे महाविद्यालय भविष्यातील विद्यापीठ-डॉ.सप्तर्षी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सोमैया महाविद्यालयात पी.एच.डी.पदवी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क यशस्वीरित्या राबविला असून या प्रकारच्या उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे महाविद्यालय भविष्यात एक नामांकित विद्यापीठ बनू शकते असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा.प्रवीण सप्तर्षी यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“पी.एच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे.या संशोधकांमार्फत दर्जेदार व समाजोपयोगी संशोधन व्हावे यासाठी विद्वान,अभ्यासू व नामवंत वक्ते निमंत्रित केले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय कोपरगाव.

कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सोमैया महाविद्यालयात सुरू असणाऱ्या पी.एच.डी.कोर्स वर्कच्या उद्घाटन यांच्याहस्ते केले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे हे होते.
संस्थेचे सचिव अड्.संजीव कुलकर्णी यांनी याप्रसंगी कोर्स वर्कला उपस्थित असणाऱ्या विविध विषयांच्या १७५ पेक्षा अधिक संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करताना प्राचार्य डॉक्टर बी.एस.यादव म्हणाले की,”पी.एच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे.या संशोधकांमार्फत दर्जेदार व समाजोपयोगी संशोधन व्हावे यासाठी विद्वान,अभ्यासू व नामवंत वक्ते निमंत्रित केले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि कोर्स वर्क यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा.जिभाऊ मोरे यांनी तर उपस्थितांना मार्गदर्शन संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी केले तर कोर्स वर्कचे समन्वयक डॉ.गणेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close