शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील…या शाळेचा चित्रकला स्पर्धेचा निकाल शतप्रतिशत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सन-२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कोपरगाव तालुक्यातील गौतम पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत लक्षवेधी यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
गौतम पब्लिक स्कुलचे यशस्वी विद्यार्थी व प्राचार्य यांचे छायाचित्र.
गौतम पब्लिक स्कूलचे ५८ विदयार्थी शासकिय चित्रकला स्पर्धेस (इंटरमिजिएट) बसले होते.या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेत ‘अ’ श्रेणीत १६ विद्यार्थी, ‘ब’ श्रेणीत ०७ विद्यार्थी तर ‘क’ श्रेणीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे.शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत मोठी निकालाची परंपरा राखलेली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,संस्थेच्या सचिव चैताली काळे,प्राचार्य नूर शेख,शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण आदींनी अभिनंदन केले आहे.