शैक्षणिक
शालेय विज्ञान प्रदर्शनातुन विदयार्थीची संशोधनवृत्ती वाढीला लागते-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शालेय शिक्षणात अंतर्भूत असलेल्या विज्ञान प्रदर्शनातुन विदयार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढुन व्यावहारीक जीवनात हि तत्वे विदयार्थीनी अंगीकारल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन कोपरगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ.अजमेरे यांनी नुकतेच कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“विज्ञान प्रदर्शनातुन विदयालयातील विद्यार्थ्यांनी इ.५ वी ते इ.१० वी विविध गटातुन गणित व विज्ञान वरील ७८ उपकरणे तयार केली होती.त्याच प्रमाणे विज्ञाना विषयावर आधारीत रांगोळी व पोस्टर स्पर्धेत जवळजवळ ८० विदयार्थीनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला आहे हि गौरवाची बाब आहे”ड़ॉ.अमोल अजमरे,बालरोग तज्ज्ञ कोपरगाव.
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंद विदयालयांत शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव दीलीपकुमार अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,प्राथमिक विभागाच्या मूख्याध्यापिका मिना पाटणी,विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी,निलेश होन,दीगंबर देसाई,राहुल चौधरी,पंकज जगताप,विजय कार्ले,सुरेंद्र शिरसाळे,श्वेता मालपुरे,गौरी जाधव,संजीवनी डरांगे,रुपाली साळुंके आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीवर उपकरण निर्मिती केल्या बददल विशेष कौतुक केले.सदर प्रसंगी उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यपक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय देसाई केले.विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगाचे परीक्षण ज्येष्ठ शिक्षक विजय कार्ले व सुरेंद्र शिरसाळे,कुलदीप गोसावी यांनी केले.
उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी उपस्थितांचे आभार मानले.