जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगाव तालुक्यातील ‘शिव बालक’चा कार्यभार स्वीकारला-…यांची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस असलेल्या उक्कडगाव येथील “शिव बालक मंदिर’ या इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार शिवाजीराव लावरे यांनी नुकताच स्विकारला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांचे शिक्षक,विद्यार्थी,पालक आदींनी स्वागत केले आहे.

आगामी काळात मुल्यात्मक शिक्षण देणे हि गरज असून त्यासाठी आपण आदर्श मुलं घडवणं हे ध्येय ठेवून या संस्थेचा वसा टिकवणार आहे,आणि तो आपण आगामी काळात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे”-शिवाजीराव लावरे,मुख्याध्यापक,शिव बालक मंदिर,उक्कडगाव,ता.कोपरगाव.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देण्यासाठी शिवाजीराव लावरे यांनी अत्यंत प्रतिकूल काळात शिक्षण संस्था काढून ते दायित्व पत्करले होते.या पूर्वी या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अन्यत्र सुमार आठ ते दहा कि.मी.अंतरावर जावे लागत होते.ती उणीव लावरे यांनी भरून काढली व विद्यार्थिनी व विद्यार्थी यांची सोय केली आहे.आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराप्रमाणे त्यांनी “विद्यार्थीं शिक्षक परायण असावा; तर शिक्षक विद्यार्थी परायण असावा’ तर शिक्षण ज्ञान पारायण असावे” अशी अपेक्षा व्यक्त केली होती.ती या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून पूर्ण झाली असे म्हणण्यास जागा आहे.त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ते नुकतेच सेवा निवृत्त झाले होते.त्यांनी या पूर्वी पाच ते दहा वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद स्वीकारले होते.मात्र सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आता पुन्हा एकदा आपल्याला ‘शिव बालक’ या इंग्रजी माध्यमिक शाळेस वाहून घेतले आहे.या शाळेत सुमारे १६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.तर कनिष्ठ महाविद्यालयात शास्त्र शाखेत सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे.या शिवाय सौ.सुशिलामाई काळे या माध्यमिक शाळेत आज रोजी ४७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सदर प्रसंगी देशमुख सर व सर्व सहकारी शिक्षक यांचे शिव बालक मंदिर उककडगाव शाळेच्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले.अतिशय खडतर वेळी देशमुख सर व सर्व सहकारी शिक्षक,शिक्षिका आदी मान्यवर शाळेच्या विकासासाठी झगडत राहिले,संस्था त्याचं मनापासून आभारी असल्याचे सांगितले आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर देशमुख सर यांनी शिवाजीराव लावरेसर यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला,तसेच देशमुख सर यांचा ही शाळेच्या योगदानाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.संस्थेने देशमुख सर यांच्यावर पुर्वीच्या सारखीच जबाबदारी टाकली आहे.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीं तसेच शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close