शैक्षणिक
सक्षम अधिकाऱ्यासाठी संयम आणि चिकाटी आवश्यक-नाईकवाडे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“एक सक्षम अधिकारी बनायचे असेल तर संयम आणि चिकाटी यांना सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड आवश्यक असून ती असेल तर स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पंकज नाईकवाडे यांनी केले कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

श्री.नाईकवाडे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून विक्रीकर अधिकारी (STI) या पदावर निवड झाली आहे. ते महाविद्यालयच्या वाणिज्य शाखेचे माजी विद्यार्थी असून बेसबॉल या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयात “तयारी स्पर्धा परीक्षांची”या व्याख्यानात ते बोलत होते.
सदर प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ प्राध्यापक के. एल.गिरमकर,प्रा.गणेश देशमुख डॉ.संतोष पगारे,डॉ.संजय अरगडे,डॉ.सुनील कुटे,डॉ. रवींद्र जाधव व डॉ.वसुदेव साळुंके उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अधिकारी म्हणून माझ्या जडणघडणी मध्ये महाविद्यालयातील क्रीडा विभाग वाणिज्य विभाग व स्पर्धा परीक्षा विभाग यांचे भरीव योगदान असल्याचे गौरवोदगार त्यांनी याप्रसंगी काढले आहे.
“स्वतःच्या क्षमतांना ओळखले तर स्पर्धापरीक्षेत तुम्ही नक्कीच यशस्वी होणार असे प्रतिपादन महाविद्यालयाचे कलाशाखा प्रमुख डॉ.के.एल.गिरमकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविकात डॉ.वसुदेव साळुंके यांनी केले त्यांनी महाविद्यालयातील पोलीस व सैन्य भरती कार्यशाळा,एम.पी.एस.सी. व्याख्यानमाला या उपक्रमांची माहिती दिली व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.सुनील कुटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन डॉ.संजय अरगडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार डॉ. रवींद्र जाधव यांनी केले आहे.