शैक्षणिक
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे डिजिटल वर्गाचे उदघाटन
न्यूजसेवा
कोपरगाव-संवत्सर(प्रतिनिधी)
इंग्रजी शाळांच्या तुलनेत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद संवत्सर शाळा ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही ही खूपच कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन नगर जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शाळेचा लौकिक वाढवला असून त्याचा फायदा संवत्सर आणि परिसरातील शाळांना फायदा होईल”-महंत रमेशगिरीजी महाराज,जनार्दन स्वामी आश्रम,श्री क्षेत्र कोपरगाव बेट.
अ.नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खा.सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील संवत्सर जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले असून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती बिले यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने ६.७२ लाखांचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे.त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी कोपरगाव बेटाचे महंत रमेशगिरीजी महाराज,जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले,तहसीलदार विजय बोरुडे,जि.प.चे माजी सदस्य राजेश परजणे,प्रभारी तालुका गट शिक्षण अधिकारी शबाना शेख,खंडू फेफाळे,लक्षणराव साबळे,सोमनाथ निरगुडे, संभाजी भोसले,बाळासाहेब वरगुडे,नामदेव पावडे बाबा,आबा नानकर,बाळासाहेब दहे,कोपरगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी जे.डी.वाघेरे,विजय जगताप,डिजिटल तज्ज्ञ संदीप गुंड,ग्रामसेवक कृष्णा अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,जिल्हा परिषद शाळा बऱ्याच वेळा उपेक्षित होत्या मात्र आता माझी याबाबत मतपरिवर्तन होणार आहे.आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त असून आपला १९९६-२००० दरम्यान अभ्यासक्रमात “यशस्वी धावपटू भाग्यश्री बिले” म्हणून धडा होता असे सांगून आगामी काळात आपण या शाळेस नक्कीच मदत करू असे आश्वासित केले आहे.
सदर प्रसंगी रमेशगिरीजी महाराज यांनी बोलताना म्हणाले की,”गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी शाळेचा लौकिक वाढवला असून त्याचा फायदा संवत्सर आणि परिसरातील शाळांना फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.
सदर प्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी गोदावरी कॉम्प्लेक्सच्यावतीने योगदान देण्यात येते यावर्षी बाळासाहेब साबळे यांनी ६५ हजार रुपयांचे डिजिटल फलकासाठी आर्थिक योगदान महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते देण्यात आले आहे.
दरम्यान तालुक्यातील पशुवैद्यक यांनी गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी बिले यांनी ६.७२ लाखांचे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे.
क्रियाशील डिजिटल फलक ही संकल्पना राबवणारे राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक संदीप गुंड यांनी डिजिटल फलक वापर करण्याचा प्रयोग उपस्थितांना करून दाखवला आहे.
प्रारंभी रमेशगिरीजी महाराज यांच्या व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या शुभहस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी बालगोपालांच्या आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक श्री पठाण,यांनी केले तर सूत्रसंचालन यांनी केले तर आभार गट शिक्षण अधिकारी शबाना शेख यांनी मानले आहे.
बातमी अद्यावत होत आहे…