शैक्षणिक
…या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय.बँकेत निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व प्लेसमेंट सेलच्यावतीने आयोजित कॅम्पस इंटरव्यूव्हच्या माध्यमातून मुंबई येथील नामाकिंत व आंतराष्ट्रीय नेटवर्क असलेल्या आय.सी.आय.सी.आय.या बँकेच्या अधिकारी पदावर सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन दहे,तेजस वाघमारे,विशाल रावले,प्रविण भोसले,अक्षय जावळे व हर्ष मालोकर यांचा समावेश आहे.या यशाबदद्ल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,संस्थेचे सचिव अॅड.एस.डी कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव आदींनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येते.विद्यार्थ्यांचे इंटरव्यु स्किल्स वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन प्लेसमेंट सेल मार्फंत करण्यात येते.यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हे सतत आग्रही असतात.या सेलचे प्रमुख प्रोफेसर डॉ.एस.आर पगारे व त्यांचे सहकारी डॉ.जी.के.चव्हाण,डॉ.एन.टी.ढोकळे, डॉ.एस.बी.भिंगारदिवे हे सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क करुन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन दहे,तेजस वाघमारे,विशाल रावले,प्रविण भोसले,अक्षय जावळे व हर्ष मालोकर यांचा समावेश आहे.या यशाबदद्ल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,संस्थेचे सचिव अॅड.एस.डी कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव आदींनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान सोमैय्या महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना संस्थाचालक देत असलेल्या प्रोत्साहनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्रोफेसर डॉ.एस.आर.पगारे यांनी नमूद केले आहे.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.