शैक्षणिक
साहित्य क्षेत्रातील…हि कृती धोक्याची-.प्राचार्य डॉ.पवार यांचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अलीकडे संशोधन क्षेत्रात काही अनावश्यक गोष्टींचा शिरकाव वाढला असून वाड;मयचौर्य ही एक अत्यंत गंभीर बाब प्रामुख्याने पुढे येत आहे.नव्या संशोधकांसाठी ही गोष्ट अत्यंत धोकादायक आणि संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असे परखड मत स्व.नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ.अर्चना पवार यांनी व्यक्त केले आहे.
एका विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्मयकृतींचा आणि वाङ्मयीन घडामोडींचा एक विशिष्ट दृष्टिकोण घेऊन केलेला ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्मयेतिहास.वाङ्मयेतिहास ही वाङ्मयाच्या अभ्यासाची एक पद्धती आहे आणि ती वाङ्मयसिद्धान्त आणि वाङ्मयीन टीका या वाङ्मयाभ्यासाच्या इतर दोन पद्धतींहून पूर्णपणे वेगळी आहे.वाङ्मयनिर्मितीच्या प्रेरणा-प्रवृत्तींची आणि प्रभाव-परिणामांची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करणे,हे वाङ्मयेतिहासाचे कार्य असते.
वाङ्मयनिर्मिती ही अखेरतः मानवी कृती आहे.मात्र चौर्य हे विकृती आहे यावर त्यांनी कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात आय.क्यु. ए.सी.व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय.पी.आर’ या विषयावरील एकदिवसीय वेबिनार प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाष्य केले आहे.या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक तसेच इंग्रजी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित होते.
सदर प्रसंगी डॉ.पवार यांनी पुढे आपल्या व्याख्यानात वाड;मयचौर्यासंबंधी होणाऱ्या शिक्षा व कॉपी राईटचे नियम या अनुषंगाने सविस्तर भाष्य केले आहे.
अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.रमेश सानप म्हणाले की,”संशोधन क्षेत्रातील आव्हाने अलीकडच्या काळात खूपच प्रभावशाली होत असून नवसंशोधकानी या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिकाकाधिक प्रगल्भ दृष्टीने विविध बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अखेरीस त्यांनी आय.पी.आर.तसेच शोधनिबंध लेखन यासंदर्भाने मार्गदर्शन केले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष रणधीर यांनी करून दिला.तर सूत्रसंचलन प्रा.मनोज आवारे यांनी केले तर प्रा.महेश दिघे यांनी आभार मानले.