शैक्षणिक
कोपरगावातील…या महाविद्यालयाने निकालाची परंपरा राखली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत कोपरगाव येथील प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित,नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींनी याही वर्षी लक्षवेधी निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे.
कोपरगाव येथील प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित,नामदेवराव परजणे पाटील कला,विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.६२ % लागला असून यामध्ये वाणिज्य शाखेतील कु.पायल भाऊसाहेब मोरे-८१.८३ टक्के, कु. साक्षी विजय शिंदे-८०.०५ टक्के,कु.पूजा बबन तनपुरे-७८.०५ टक्के गुण मिळवून यांनी महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेतून कु.समृद्धी आनंद कोठारी हिने ७२.५० टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.तर कु.निकिता अनिल गोपाळे-७२.३३ टक्के व कु.प्रियांका संपत कोकाटे-७१.५० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या यशस्वी विद्यार्थीनींना प्रा.शैलेश कुलकर्णी,प्रा.शबनम पटेल,प्रा.दत्तात्रय सोनवणे,प्रा.भारती करपे,प्रा.रंजना बारगळ,प्रा.माया दवणे,प्रा.पूनम जिभकाटे,प्रा.आनंद शिंदे,प्रा.सोमनाथ सूर्यवंशी, प्रा.तृप्ती काळंगे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल आ.राधाकृष्ण विखे,माजी जि.प.अध्यक्षा शालिनी विखे,जि.प.सदस्य व महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे,खा.डॉ.सुजयदादा विखे,संस्थेचे सचिव प्रा.डॉ.हरिभाऊ आहेर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेशकुमार लंगोटे,समन्वयक डॉ.किसनराव थेटे,प्रशासकीय अधिकारी सुनीताताई कदम यांनी अभिनंदन केले आहे.